Home शहरं नाशिक Nashik News : एनटीएच्या वतीने परीक्षा अर्जांना मुदतवाढ - extension of examination...

Nashik News : एनटीएच्या वतीने परीक्षा अर्जांना मुदतवाढ – extension of examination applications on behalf of nta


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बहुतेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांचे अर्जदेखील भरलेले नाहीत. या विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी, यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या वतीने विविध परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

एनटीएच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा, युजीसी नेट, अॅग्रीकल्चरल रिसर्च, जॉईंट सीएसआयआर टेस्ट आदी परीक्षांसाठी ही मुदतवाढ देण्यात येणार आहे. एनटीएने वाढवून दिलेल्या मुदतीनुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अभ्यासक्रम प्रवेशपरीक्षा, युजीसी नेट या परीक्षांसाठी ३१ मेपर्यंत अर्ज करता येतील. इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च (आयसीएआर), जॉईंट सीएसआयआर या परीक्षेसाठीही ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याशिवाय वैद्यकीय प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या परीक्षेसाठी यापूर्वी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. आता अर्जासाठी नसली तरीही अर्जदुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

grant to marathwada farmers: बारा लाख शेतकऱ्यांना ५५३ कोटी वाटप – 553 crore rupees of grant distributed to farmers in mrathwada

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली...

Maharashtra Gram Panchayat Nivadnuk Nikal 2021: गिरीश महाजनांनी गड राखला; ४५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा – girish mahajan win in 45 seat gram panchayat elections

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल...

Tesla Motors Will Route Its India Investment Through Dutch Arm – टेस्ला भारतात; पण एलन मस्क यांनी टाकला हा मोठा डाव | Maharashtra Times

मुंबई : अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी टेस्लाने भारतात येण्यासाठी नेदरलँडचा कर सवलतीचा मार्ग शोधला आहे. टेस्ला अॅम्स्टरडॅम ही टेस्ला मोटर्स अँड एनर्जी इंडियाची मुख्य...

Recent Comments