Home शहरं नाशिक Nashik News : करोना पॉझिटिव्ह: जळगाव तीन हजाराच्या टप्प्यात - coronavirus patients...

Nashik News : करोना पॉझिटिव्ह: जळगाव तीन हजाराच्या टप्प्यात – coronavirus patients in jalgaon in are three thousand


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात पुन्हा ११७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण २९७१ वर पोहचली आहे. चिंतेची बाब म्हणजे, शुक्रवारी कोरोनाबाधित असलेल्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २१४ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ११७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ५४, जळगाव ग्रामीण ३, अमळनेर ४, भुसावळ ६, भडगाव २१, चोपडा ३, धरणगाव १, एरंडोल १, जामनेर २, पारोळा ४ तर रावेर येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. जळगाव शहरात शुक्रवारी देखील अर्धशतकापेक्षा जास्त म्हणजेच ५४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जळगावातील रुग्णसंख्या ६०६ इतकी झाली आहे.

शिरपूरमध्ये तीनशे करोना रुग्ण

धुळे : धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात करोना आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात धुळे शहर व शिरपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्ण्‍ आढळून येत आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण शिरपूर तालुक्यातील (३०६) आहेत. शुक्रवारी दुपारपर्यत जिल्ह्यात नवीन १४६ करोना रुग्ण आढळून आलेत. तर ७० वर्षीय एका वृद्धाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात आता करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. धुळे शहर व शिरपूर तालुका करोना हॉटस्पॉट बनले आहे. गुरुवारी दिवसभरात ७० आणि शुक्रवारी दुपारपर्यत ७६ असे १४६ रुग्ण नवीन आढळून आले आहेत. शुक्रवारअखेर जिल्ह्यात एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ८६३ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण शिरपूर तालुक्यातील (३०६) आहेत.

नंदुरबारमध्ये पैद्यकीय पथक बाधित

नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यत नवीन ४७ करोना रुग्ण आढळून आले होते. यात नंदुरबार शहरातील ३६ रुग्णांचा समावेश होता. तर इतर शहादा, तळोदा व मोलगी येथील रुग्णांचा समावेश होता. यामुळे जिल्ह्यात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १५४ वर गेली असून, यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रशियाहून नंदुरबारला चार विद्यार्थी परत आले. यापैकी दोन जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर, चार परिचारक, एक वार्डबॉय अशा सात जणांना देखील करोना आजाराची लागण झाली आहे. जिल्हयात एकूण १५४ करोना रुग्णांपैकी ५२ जण करोनामुक्त झाले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments