Home शहरं नाशिक Nashik News : घडी बसतेय; अशी घेतली जातेय खबरदारी - after coronavirus...

Nashik News : घडी बसतेय; अशी घेतली जातेय खबरदारी – after coronavirus lockdown the clock is ticking


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

करोनाचे विघ्न परतवून लावण्यासाठी विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायावर सुमारे अडीच महिने पाणी सोडावे लागले. त्यात लाँड्री व्यावसायिकांचा देखील समावेश होता. तब्बल अडीच महिने ठप्प असलेला हा व्यवसाय नुकताच पुन्हा रुळावर आला आहे. व्यवसाय सुरू झाल्याने लाँड्री व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी सुरक्षाविषयक जबाबदारीत मात्र कित्येक पट वाढ झाली आहे.

मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने पहिला लॉकडाउन झाला आणि लाँड्री व्यवसायाला देखील इतर व्यवसायांप्रमाणे टाळे लागले. हे टाळे लॉकडाउनच्या जून महिन्यातील चौथ्या टप्प्यात अंशतः उघडले गेले. दरम्यानच्या सुमारे अडीच महिन्यांच्या काळात लाँड्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. परंतु आता हा व्यवसाय पुन्हा नवीन आयामांसह सुरू झाला आहे. पूर्वीपेक्षा या व्यवसायात आता बरेच बदलही झाले आहेत. करोना संसर्गाची भीती या व्यावसायिकांच्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी कायम असल्याने सुरक्षा विषयक उपाययोजना राबवूनच या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला आहे.

अशी घेतली जातेय खबरदारी

ग्राहकांकडून इस्त्रीसाठी येणारे कपडे देखील करोना संसर्गाचे वाहक ठरू शकतात. त्यामुळे इस्त्रीसाठी येणारे सर्व कपडे प्रथम सॅनिटइझ केले जातात. हे सर्व कपडे एक दिवस आहे तसेच ठेवले जातात. त्यानंतर त्यांची इस्त्री केली जाते. ग्राहकांना देखील दुकानापुढे थांबू दिले जात नाही. कपड्यांची इस्त्री आणि इतर कामे आटोपल्यावर ग्राहकांना फोन करून कळविले जाते. पैसेही ऑनलाइन चुकते करण्यास प्राधान्य दिले जात आहे. करोनामुळे या व्यवसायाला देखील नवीन स्वरूप प्राप्त झाले आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच महिने लाँड्री व्यवसाय देखील बंद होता. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यावर हा व्यवसाय सुरू झाला असला तरी सुरक्षेच्या कारणास्तव या व्यवसायाची संपूर्ण नियमावलीच बदलली आहे. -शशी चौधरी, लाँड्री व्यावसायिक.

लाँड्री व्यवसाय लॉकडाऊन काळात बंद राहिल्याने मोठी गैरसोय झाली. कपडे इस्त्रीचे काम घरीच करावे लागले. आता लाँड्री व्यवसाय सुरू झाला असला तरी त्यातील सुलभता पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. आता वेळेचा अपव्यय वाढला आहे. -विनोद महाजन (ग्राहक)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

Recent Comments