Home शहरं नाशिक Nashik News : चार कंटेन्मेंट झोन खुले - four containment zones open

Nashik News : चार कंटेन्मेंट झोन खुले – four containment zones open


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील सावतानगर, सातपूर कॉलनी, मालपाणी सॅफ्रॉन, उत्तमनगर ही चार ठिकाणे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली होती. त्यानंतर चौदा दिवस तपासणी करून या परिसरात एकही रुग्ण न आढळल्याने आता हे चारही भाग कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. रुग्ण आढळल्यानंतर या चारही परिसरांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. मात्र, आता चौदा दिवसांनंतर या परिसरात एकही करोनाबाधित रुग्ण न आढळल्याने हा परिसरात कंटेन्मेंट झोनमधून रद्द करण्यात आल्याची घोषणा आयुक्त गमे यांनी केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग अधिनियम १८९७ नुसार नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये कामकाज सुरू आहे. करोनाबाधित रुग्ण असलेल्या क्षेत्रातून नागरिकांची तपासणी करून त्यातील कुणी बाधित आहे किंवा नाही हे तपासले जाते. त्या अनुषंगाने उत्तमनगर, सातपूर कॉलनी, सावतानगर, मालपाणी सफ्रोन या भागात रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रविवारपासून हा परिसर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे, असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दुकानांची वेळ दुपारी चारपर्यंत

कंटेन्मेंट झोन जाहीर झाल्याने या परिसरात कुणालाही प्रवेश करण्यास, तसेच येथून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. या ठिकाणी परिसरातील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली असून, तपासणीनंतर गेल्या काही दिवसांत येथे रुग्ण न आढळल्याने हा परिसरा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील दुकाने शासकीय निर्देशानुसार दुपारी चार वाजेपर्यंत उघडी राहतील. या चारही भागांतील कंटेन्मेंट झोनचे निर्बंध हटविल्याने या परिसरात विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होण्यास मदत होणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

Recent Comments