Home शहरं नाशिक Nashik News : चिमुकलीची करोनावर मात - chimukali overcomes karona

Nashik News : चिमुकलीची करोनावर मात – chimukali overcomes karona


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

डेडिकेटेड करोना हेल्थ केअर सेंटर सुरू झाल्यानंतर या ठिकाणी उपचार घेतलेल्या करोनाबाधित रुग्णांपैकी वडगाव (ता. सिन्नर) येथील पाच वर्षीय चिमुकलीने करोनावर यशस्वीपणे मात केल्याने तिला शनिवारी (दि. १६) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ही चिमुकली या रुग्णालयात चौदा दिवस उपचार घेत होती.

वडगाव या गावात एक मे रोजी करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्याच्यावर नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, या रुग्णाच्या अवघ्या पाच वर्षांच्या पुतणीलाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या मुलीला सिन्नर येथील डेडिकेटेड करोना हेल्थकेअर सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. चौदा दिवसांच्या उपचारांनंतर या चिमुकलीने करोनावर मात केली. शनिवारी तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला पवार, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. सुशिला पवार, डॉ. सुप्रिया वेटकुळे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिला घरी सोडण्यात आले. यावेळी या मुलीला रुग्णालयातील डॉक्टरांनी नवीन ड्रेस व मिठाईची भेट देत तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. करोनाशी दोन हात करून घरी परतलेल्या या चिमुकलीचे तिच्या गावातही उत्स्फूर्त स्वागत झाले. तिच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. सिन्नरच्या डेडिकेटेड करोना हेल्थकेअर सेंटरमधून करोनावर मात करणारी वडगावची ही मुलगी पहिलीच रुग्ण ठरली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Tim Paine: IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर आली ही वाईट वेळ, जगासमोर लाज गेली… – ind vs aus : australia captain...

नवी दिल्ली, IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची...

Recent Comments