Home शहरं नाशिक Nashik News : जिल्ह्यात लॉकडाउन ‘जैसे थे’ - lockdown in the district...

Nashik News : जिल्ह्यात लॉकडाउन ‘जैसे थे’ – lockdown in the district ‘as it was’


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातही ३१ मेपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी दिली. शहरासह जिल्ह्यातील रेड झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असून, ऑरेंज झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच शिथिलता कायम राहणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या तिसऱ्या लॉकडाउनची मुदत संपली आहे. परंतु, करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी हे लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य तसेच केंद्र सरकारकडून घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा स्तरावरही ३१ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. करोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर व्यवहार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील. नव्याने प्रतिबंधित क्षेत्र आढळले तर तेथेही निर्बंध लादले जाणार आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात ९० टक्के परिसर प्रतिबंधित असून तेथे जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवहार बंदच ठेवले जाणार आहेत.

जिल्ह्यात १८६ प्रतिबंधित क्षेत्रे

मालेगाव महापालिका क्षेत्रात ११९, नाशिक शहरात २३, येवल्यात १२, निफाडमधील नऊ, नाशिक तालुक्यात सहा, सिन्नरमध्ये पाच, दिंडोरी व नांदगावात प्रत्येकी तीन, मालेगाव ग्रामीण व चांदवड प्रत्येकी दोन, कळवण आणि बागलाणमधील प्रत्येकी एक क्षेत्र प्रतिबंधित जाहीर करण्यात आले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि देवळा हे पाच तालुके ऑरेंज झोनमध्ये आहेत. बस, टॅक्सी, रिक्षा, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, चित्रपटगृहे, मॉल्स, जिम, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सलून दुकाने, स्पा, जलतरण तलाव, बार, क्रीडांगणे, आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतूक याशिवाय सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक, क्रीडा विषयक कार्यक्रम बंदच राहतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sambhaji Bidi: ७० वर्षांनंतर संभाजी बिडीचे नाव बदलले, आता या नावाने विक्री करणार – sambhaji bidi to be disappeared, company change product name

म.टा. प्रतिनिधी, नगर: विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यामातून केलेल्या विरोधाची दखल घेत विडी उत्पादक साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले...

fire at serum institute: सीरमच्या आगीमागे घातपाताचा संशय; CM ठाकरे स्पष्टचं बोलले – the covid vaccine is safe. i have not spoken to adar...

पुणेः सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आगीमागे विरोधकांनी घातपाताची शक्यता वक्तव्य केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच खडसावलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार...

nashik municipal corporation administration: ‘हात की सफाई’ला ब्रेक! – nashik mayor satish kulkarni is dadasaheb gailkwad assembly cleaning proposal sent return to nashik municipal...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदादासाहेब गायकवाड सभागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली कार्योत्तर मंजुरी देऊन ५६ लाख रुपये मक्तेदाराच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा आठवा प्रयत्न महासभेने हाणून...

Recent Comments