Home शहरं नाशिक Nashik News : जिल्ह्यात ३६ अहवाल पॉझिटिव्ह - 36 reports positive in...

Nashik News : जिल्ह्यात ३६ अहवाल पॉझिटिव्ह – 36 reports positive in the district


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील करोनाबधितांचा आकडा वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात तब्बल ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील एक जण जिल्ह्याबाहेरील आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या रुग्णांचा आकडा बुधवारी २८५ इतका होता. त्यात चारने वाढ झाली असून, गुरुवारी ही संख्या २८९ इतकी झाली आहे. मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, बुधवारी नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ५१२ इतकी होती. त्यात वाढ होऊन ती ५३९ वर पोहोचली आहे. शहरात एकाच दिवशी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या तुलनेत मालेगावातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होताना दिसते आहे. मालेगाव शहरातील रुग्णांची संख्या बुधवारी ८५८ होती. त्यात चार चार रुग्णांची वाढ झाली आहे. ही रुग्णसंख्या गुरुवारी ८६२ वर पोहोचली आहे. जिल्हाबाह्य रुग्णांची संख्या बुधवारी ६९ इतकी होती. त्यात एकने वाढ झाली असून, ती ७० झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३६ झाला आहे.

चार मृतांचा समावेश

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण चार करोनाबधितांचा मृत्यू झाला. ठाकरे बंगला परिसरातील एका वृद्ध महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला, तर गंगापूर रोडवरील शर्मिला अपार्टमेंट येथील ५५ वर्षीय पुरुषाचा बळी गेला आहे. उर्वरित मृतांमध्ये एक जण येवल्यातील असून, एक जिल्हाबाह्य आहे.

नाशिक शहर हॉटस्पॉट

एकीकडे मालेगाव शहर करोनाचे हॉटस्पॉट झाले असताना त्या ठिकाणची परिस्थिती आता निवळू लागली आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ चार रुग्णांची भर पडली तर नाशिक शहरात तब्बल २७ रुग्णांची भर पडली आहे. नाशिक शहरात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. नागरिकांनी नियम पाळले नाही तर यानंतरही तो जास्त वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिक जिल्हा

– एकूण पॉझिटिव्ह १७३७

– बरे झालेले रुग्ण-११५२

– जिल्ह्यातील मृत्यू-१०९

– गुरुवारी दिवसभरात दाखल झालेले संशयित रुग्ण-१६७

मालेगाव

-उपचार घेत असलेले रुग्ण ७९

-मालेगाव मृत्यू-६४

नाशिक शहर

– बरे झालेले रुग्ण-१९६

– उपचार घेत असलेले-२९४

– मृत्यू-२६Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse Live Updates: Live: थोड्याच वेळात एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश – live updates: eknath khadse joining ncp

मुंबई: भाजपला रामराम ठोकणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीनेही...

PM Narenda Modi: पंतप्रधान मोदी करणार पहिल्या ‘सी-प्लेन’चे लोकार्पण – pm narendra modi to inaugurate first seaplane service from sabarmati riverfront to statue of...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या 'सी-प्लेन'चे (पाण्यावर उतरू शकणारे आणि तेथून उड्डाण करू शकणारे विमान) लोकार्पण ३१ ऑक्टोबर...

Sanjay Raut: ही तर मोदींची बदनामी; भाजपच्या ‘लस वाटप’ घोषणेवर शिवसेनेचा बाण – shivsena mp sanjay raut attacks bjp over bihar election manifesto

मुंबई: 'पूर्वी जातीधर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचे प्रयत्न व्हायचे. आता लसीच्या नावावर देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार...

Recent Comments