Home शहरं नाशिक Nashik news: ‘त्यांना’ सेवा समाप्तीच्या नोटिसा - notice of termination of service...

Nashik news: ‘त्यांना’ सेवा समाप्तीच्या नोटिसा – notice of termination of service to them


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वादग्रस्त नोकरभरती रद्द करण्याचे आदेश मंत्रालयातून प्राप्त झाले आहे. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळातील संबंधित निवडीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती संदर्भातील नोटीस बजावण्याचे काम सुरू झाल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नितीन पाटील दिली आहे. या भरती प्रक्रियेतील अनियमिततेप्रकरणी तत्कालीन अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याने पुण्यातील एका खासगी कंपनीच्या अडचणी वाढणार आहेत.

आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळासाठी २०१६ मध्ये ५८४ पदांची भरतीप्रक्रिया वादात सापडली होती. विभागाने शासनमान्य तांत्रिक संस्था सोडून खासगी संस्थेकडून पहिल्या टप्प्यात ३६१ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली. भाजपचे दिंडोरीचे तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या भरती प्रक्रियेत तीनशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सदरच्या भरतीला स्थगिती देत, चौकशीचे आदेश दिले होते. तरीही तत्कालीन एमडी बाजीराव जाधव आणि नरेंद्र मांदळे यांनी जवळपास २४० अधिकारी व कर्मचारी भरती करून घेतले होते.

तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवलेंच्या चौकशी समितीत भरतीप्रक्रियेत अनियमितता आढळली. सदरचा चौकशी अहवाल चार वर्षांपासून शासनदरबारी पडून होता. अखेर आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी या अहवालाच्या आधारे भरती प्रक्रिया रद्द करत, दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. यानंतर विद्यमान एमडी नितीन पाटील यांनी मंगळवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून संबंधितांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावल्या. संबंधितांना बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर सेवासमाप्ती केली जाणार आहे. दरम्यान, यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

जाधव, मांदळे यांच्यावर कारवाई अटळ

भरती प्रक्रिया रद्द करण्यासोबतच अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश मंत्रालयातून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या भरतीप्रक्रियेप्रसंगी एमडी असलेले बाजीराव जाधव आणि तत्कालीन प्रशासन व्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संबंधितांवर महामंडळातर्फे फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासोबतच या भरतीप्रक्रिया राबविणारी पुण्यातील एका खासगी कंपनीवरही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

संबधित कर्मचारी-अधिकाऱ्यांना सेवासमाप्ती संदर्भात १५ दिवसांच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. बाजू मांडण्याची शेवटची संधी दिली जात असून या भरतीप्रक्रियेतील तत्कालीन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यांसदर्भातही निर्देश प्राप्त झाले आहेत.

– नितीन पाटील,

व्यवस्थापकीय संचालक,

आदिवासी विकास महामंडळSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Hazaribagh: आदिवासी विद्यार्थिनीला हेडमास्तरने पुस्तक घेण्यासाठी घरी बोलावले, त्यानंतर… – tribal girl student raped in hazaribagh in jharkhand

हजारीबाग: झारखंडमधील दुमका, खुंटीसह अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांनंतर आता हजारीबागमध्ये आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कटकमदाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खीरगढा...

Sanjay Raut: ‘राज्याचा कारभार देशात एक नंबर; बाळासाहेब नक्कीच आशीर्वाद देत असतील’ – sanjay raut pays tribute to balasaheb thackeray on his birth anniversary

मुंबईः 'आज बाळासाहेबांचा आमच्यासाठी जन्मदिवस असून आजही बाळासाहेब आमच्या सोबत आहेत. आज जे काही महाराष्ट्राचे, शिवसेनेचं, महाविकास आघाडीचं चाललं आहे त्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद...

Recent Comments