Home शहरं नाशिक Nashik News : दुचाकींची समोरासमोर धडक; दोन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू - two-wheeler...

Nashik News : दुचाकींची समोरासमोर धडक; दोन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू – two-wheeler head-on collision; accidental death of both young men


दुचाकींची समोरासमोर धडक;

दोन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू

अजमेर सौंदाणे फाट्याजवळील अपघात

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

आपापली कामे आटोपून दुचाकी वाहनावरून सायंकाळी घराकडे परतत असताना दोघा युवकांचा समोरासमोर अपघात होऊन दोघे ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) घडली. या घटनेनंतर सटाणा व ब्राह्मणगाववर शोककळा पसरली आहे.

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील अजमेर सौंदाणे फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अतुल रमेश सोनवणे (वय २३, रा. ब्राह्मणगाव) हा युवक आपले दुचाकी (एमएच ४१ एएक्स ६९८८) ने सटाणा येथून ब्राह्मणगावकडे परतत असताना शेतातील कामे आटोपून आपल्या दुचाकीने सटाणा शहराकडे घरी परतताना ललीत अंबादास सोनवणे (वय २६, रा. सटाणा) यास जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात अतुल रमेश सोनवणे हा जागीच ठार झाला, तर ललीत यास डोक्याला व डोळ्याला गंभीर मार बसल्याने सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचे रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत अतुल सोनवणे याच्यावर ब्राह्मणगाव येथे रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर ललीत सोनवणे याच्यावर रविवारी सकाळी सटाणा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

ललीत सोनवणे हा येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे विश्‍वस्त कौतिक सोनवणे यांचा नातू तर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अंबादास सोनवणे यांचा मुलगा होता. मृत अतुल आणि ललीत यांच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. ललीत सोनवणे हा युवक अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा, सामाजिक बांधिलकी जोपासणारा होता. त्याच्या निधनाने सटाणा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mns vs shiv sena: मुंबई: शिवाजी पार्क येथील ग्रीलवरून शिवसेना-मनसेत वाद – disputes between shivsena and mns over steel grill on veer savarkar marg...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील सुस्थितीतील स्टीलचे ग्रील काढून तेथे लोखंडी ग्रील बसवले जाणार असल्याचा दावा मनसेने केला...

Mahesh Manjrekar: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात शिवीगाळ व दमदाटीची तक्रार – pune: yavat police registered non cognizible offence against actor director mahesh manjrekar

म. टा. वृत्तसेवा । दौंड पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या गाडीला एका कारने पाठीमागून धडक दिल्यानं संतापलेल्या...

Recent Comments