Home शहरं नाशिक Nashik News : दोन बड्या हॉस्पिटल्सना नोटिसा - notice to two large...

Nashik News : दोन बड्या हॉस्पिटल्सना नोटिसा – notice to two large hospitals


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील खासगी हॉस्पिटल्सकडून करोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार शिवसेनेकडून पुराव्यानिशी आल्यानंतर महापालिका प्रशासन अखेर कारवाईसाठी उशिरा का होईना जागे झाले आहे. यापूर्वी दाखल असलेल्या तीन तक्रारी आणि शुक्रवारी दाखल दोन नवीन तक्रारींच्या आधारे शहरातील दोन नामांकित कॉर्पोरेट हॉस्पिटल्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीने या दोन हॉस्पिटल्सना नोटिसा देण्यासोबतच शहरातील खासगी हॉस्पिटल्सची तपासणी सुरू केली असून, प्रत्येक रुग्णालयाकडून पाच बिले मागविण्यात आली आहेत.

शहरातील काही बड्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून उपचारांसाठी १२ ते १६ लाख रुपये उकळले जात असल्याची तक्रार बोरस्ते यांनी पुराव्यानिशी केली आहे. शुक्रवारी मनोज लुंकड यांनी महापालिकेकडे तक्रार करून अशोका मेडिकेअर हॉस्पिटलने करोनाबाधित रुग्णाकडून ११ लाख ९१ हजार रुपयांचे बिल घेतल्याचा दावा केला आहे, तर माणिक राजाराम तिडके यांनीसुद्धा अशोका मेडिकेअर रुग्णालयाने साडेसात लाख रुपये बिल घेतल्याचा आरोप महापालिकेच्या तक्रार निवारण समितीकडे बिलांनिशी केला आहे. यासोबत जादा बिलांसंदर्भात बी. जी. सोनकांबळे यांच्या तक्रार निवारण समितीकडे यापूर्वी तीन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेकडे जवळपास पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित खासगी रुग्णालयांना पाठीशी घालण्याचे धोरण महापालिकेचे अधिकारी राबवित असल्याने या अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयांशी हातमिळवणी तर केली नाही ना, असा आरोप बोरस्तेंनी केला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले आहे. महापालिकेच्या तक्रार निवारण समितीने यापूर्वी प्राप्त तीन तक्रारींच्या आधारे इंदिरानगर येथील एक आणि भाभानगर येथील एक अशा दोन नामांकित हॉस्पिटल्सना नोटिसा बजावल्याची माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली. त्यामुळे हॉस्पिटल्सच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

हॉस्पिटल्सच्या तपासणीस प्रारंभ

खासगी रुग्णालयांबाबत जादा बिलाच्या तक्रारी प्राप्त होण्यास सुरुवात होताच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खासगी हॉस्पिटल्सची तपासणी सुरू केली आहे. ज्या हॉस्पिटल्समध्ये करोना रुग्ण दाखल आहेत त्या रुग्णालयांकडून पाच बिले वैद्यकीय विभागाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाच बिलांची छाननी केली जाणार असून, रुग्णालयाने जादा बिल घेतल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेकडे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीत इंदिरानगर आणि भाभानगर येथील नामांकित खासगी रुग्णालयांनी शासन निर्देशित दरांपेक्षा अधिक दर आकारल्याचे समोर आले आहे. सदर रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, रुग्णालयांकडून प्राप्त होणाऱ्या खुलाशांनंतर दोषी आढळल्यास संबंधित रुग्णालयांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल

-राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

महापालिकेने आधीच खासगी हॉस्पिटल्सबाबत कारवाई केली असती, तर अनेक नागरिक तक्रारीसाठी पुढे आले असते. नागरिकांनी थेट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या हॉस्पिटल्सवर कठोर कारवाई व्हावी.

-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेतेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nagpur latest news update: Nagpur: डोळ्यादेखत मुलगा बुडाला; पालकांना बसला जबर मानसिक धक्का – nagpur 13 year old boy drowns in pench river

नागपूर: डोळ्यादेखत पोटच्या पोराने जग सोडावे यापेक्षा मोठे दु:ख कदाचित या जगात नसेल. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सहलीला गेलेल्या एका १३...

green tax: ​तुमच्याकडे ८ वर्षे जुनी गाडी आहे? भरावा लागू शकतो ‘हा’ मोठा कर – green tax will be imposed on old polluting vehicles

नवी दिल्लीः वाहतुकीशी संबंधित ८ वर्षांपेक्षा जुन्या सर्व वाहनांना ग्रीन टॅक्स ( green tax ) भरावा लागेल. हा रस्ते कर १०-२५ टक्के असू...

R Ashwin: ऑस्ट्रेलिया संघासोबत लिफ्टमध्ये प्रवेश दिला नाही; भारतीय गोलंदाजाने केला धक्कादायक खुलासा – r ashwin says we were not allowed to enter lift...

नवी दिल्ली: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याची घटना सर्वांना माहिती आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे...

Recent Comments