Home शहरं नाशिक Nashik News : धडक देऊन कारचालकाचे देवळालीमधून पलायन - the driver escaped...

Nashik News : धडक देऊन कारचालकाचे देवळालीमधून पलायन – the driver escaped from the temple by hitting


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडमारुती अल्टो कारने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य नाशिकरोड उड्डाणपुलावरूनच खाली कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडल्यानंतर कारचालकाने देवळाली कॅम्पकडे कार सोडून पलायन केले. दुचाकीवर मागे बसलेल्या नीता प्रसाद पागधरे (वय ३४, रा. हरिसंस्कृती अपार्टमेंट, नाशिकरोड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रा. प्रसाद पागधरे गंभीर जखमी झाले आहेत. मारुती कारचालकाने (एमएच १५, आर ४६३०) पागधरे दाम्पत्याच्या दुचाकीला (एमएच ०१, एवाय ३२५९) मागून धडक दिल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी आणि अपघाताची माहिती पोलिसांना न देताच

पलायन केले. त्याने नाशिक-पुणे महामार्गाने पुढे चेहेडी पंपिंग स्टेशन रस्त्याने रेल्वे फाटक ओलांडून देवळाली कॅम्पच्या दिशेने कार भरधाव नेली. पोलिसांना स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच हवालदार अलाउद्दिन शेख, बंडू भातोडे आणि दीपक चव्हाण यांनी कारचा पाठलाग केला. पोलिसांकडून पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच चालकाने देवळाली कॅम्पजवळील हॉटेल निकीसागर भागात कार उभी केली आणि तेथून तो पसार झाला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून, कारचालकाचा शोध सुरू आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Chitra Wagh: पवारसाहेब, आज मला तुमची खूप आठवण येते सकाळपासून: चित्रा वाघ – pawar saheb i miss you very much since this morning says...

हायलाइट्स:'पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते', असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी...

petrol rate hike: पेट्रोल-डिझेल महागले; तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका – petrol diesel rate hike today after three day pause

हायलाइट्स:पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा इंधन दरवाढ केली.याआधी सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते.आज पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल १७...

Sanjay Raut Praises Uddhav Thackeray: ‘उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत’ – uddhav thackeray is mr. satyawadi, says shiv sena...

मुंबई: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' असा दावा शिवसेनेचे...

Recent Comments