Home शहरं नाशिक Nashik News : नगरच्या आदिवासी पट्ट्यात करोनाचा वाढता - corona grows in...

Nashik News : नगरच्या आदिवासी पट्ट्यात करोनाचा वाढता – corona grows in the tribal belt of the town


नगरच्या आदिवासी पट्ट्यात

करोनाचा वाढता प्रसार

म. टा. प्रतिनिधी, नगर

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्याला आर्थिक आधार देणारे मुंबईकर आता तालुक्यात करोनाचा प्रसार होण्याचे कारण ठरत आहेत. आज तालुक्यात ६ नवे रुग्ण आढळून आले. या आदिवासी भागतील करोना बाधितांची संख्या आता १८ झाली आहे.

अकोले तालुक्यात करोनाचा प्रसार होण्यास मुंबईहून परतणारे नागरिक हे प्रमुख कारण असल्याचे पुढे आले आहे. करोनाग्रस्त शहरांतील नागरिकांनी अधिकृतपणे आणि मोठ्या संख्येने अनधिकृतपणेही अकोले तालुक्यात प्रवेश केला आहे. एरवी अकोले तालुक्यासाठी ही शहरे आणि तेथे नोकरी-व्यवसाय करणारे आपले नातलग हाच मोठा आधार असतो. तालुक्यातील शेतीमालही याच शहरांत विक्रीसाठी जातो. शहरांत संसर्ग वाढल्याने या मंडळींनी आता गावाकडे धाव घेतली आहे. त्यांच्यासोबत करोनाचा संसर्गही आल्याचे आढळून येते. आधीच आरोग्य सेवा कमकुवत असलेल्या या भागात ही नवी चिंता निर्माण झाली आहे. तेथील रुग्णांना तपासणी आणि उपचारांसाठीही दूर जावे लागत आहे. शहरच नव्हे तर ग्रामीण म्हणजे आदिवासी पट्ट्यातही या रोगाचा शिरकाव झाला आहे.

काँग्रेसमध्ये युवकांना डावलेले जातेय

सत्यजित तांबे यांची तक्रार

म.टा. प्रतिनिधी, नगर

‘काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस येण्यासाठी युवकांना प्रोत्साहन आणि काम करण्यासाठी योग्य स्थान मिळण्याची गरज आहे. प्रत्यक्षात शासकीय समित्यांवरील नियुक्त्या आणि मंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यांच्यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डावलेले जात आहे,’ अशी तक्रार युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांचे भाचे असलेल्या तांबे यांनी हे पत्र लिहिले आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनाही हे पत्र पाठविण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या खांदेपालटाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी आपल्या मामांनाच जाहीरपणे लिहिलेल्या या पत्राची वेगळी चर्चा होऊ शकते.

शिर्डी पुढील चौदा दिवस बंद

म. टा. प्रतिनिधी, नगर

शिर्डी शहर पुढील १४ दिवस पूर्ण बंद राहणार आहे. शेजारच्या गावात कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर झाल्याने आणि शिर्डीतही एक रुग्ण आढळल्याने प्रशासन व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.

शिर्डी शेजारील निमगाव मध्ये पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे तेथे १२ जून पर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करून गाव सील करण्यात आले आहे. दरम्यान, या गावातील एक बाधित महिला शिर्डीतील तिच्या माहेरी मुक्कामी होती. त्यामुळे शिर्डीतील एका महिलेलाही लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक घेतली. पुढील धोका टाळण्यासाठी चौदा दिवस शिर्डीतील व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. शिर्डी नगर पंचायत चे कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Recent Comments