Home शहरं नाशिक Nashik News : पोलिस संरक्षण देतो, पण सिलिंडर पुरव - police provide...

Nashik News : पोलिस संरक्षण देतो, पण सिलिंडर पुरव – police provide protection, but supply cylinders


मनपा उपायुक्तांचे पुरवठादाराला साकडे

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिकेने तयार केलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडर पुरविणाऱ्या इंदूर गॅस एजन्सीला काही नागरिकांकडून अरेरावी व जबरदस्ती केली जात असल्याची तक्रार एजन्सीचालक यांनी रविवारी (दि. २४) महापालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली. जीविताला धोका असल्याने त्यांनी पुढे सेवा देण्यास असमर्थता दर्शवली. अखेर उपायुक्त कापडणीस यांनी पुरवठादारास पोलिस संरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

शहरातील मनपाच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन गॅसपुरवठा करणारी संचालक भरत मेहता यांची इंदूर गॅस एजन्सी ही एकमेव संस्था आहे. येथे २१ व २३ मे रोजी काही नागरिकांनी येऊन गोंधळ घातला. त्यांना धमक्या दिल्या. त्यामुळे ‘माझे मानसिक खच्चीकरण झाले असून, मी यापुढे ऑक्सिजन गॅस पुरवठा करू शकत नाही. माझ्या जीविताला धोका आहे’, अशी असमर्थता दर्शवत पुरवठादाराने गॅस गोडाऊनच्या चाव्याच कापडणीस यांना देण्याचा प्रयत्न केला. अखेरीस आयुक्तांनी पुरवठादारास हात जोडले. तसेच पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांना भ्रमणध्वनीवरून ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीला पोलिस संरक्षण द्यावे, अशी सूचना केली.

फोटो ओळ…पुरवठादारास हात जोडताना उपायुक्त.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments