Home शहरं नाशिक Nashik News : प्रत्यक्ष खरेदीची मजा न्यारीच - it's just fun to...

Nashik News : प्रत्यक्ष खरेदीची मजा न्यारीच – it’s just fun to shop


बाजारात ग्राहकांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी गेल्या काही महिन्यांत जीवनावश्यक वस्तू, भाजी, फळे खरेदी ऑनलाइन माध्यमातून करण्यास मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात होते. आता मात्र, लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आल्यापासून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच भाजी, फळांची तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी प्रत्यक्ष जाऊन करण्यावर भर दिला जात आहे. बाजारपेठांमधील वाढत्या गर्दीवरून हे दिसून येत आहे.

करोनाच्या चिंतेने मार्च, एप्रिल, मे महिन्यात भीतीचे वातावरण पसरले होते. संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्याने घरात राहूनच ऑनलाइन माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसही प्राधान्य दिले जात होते. ३१ मेनंतर मात्र परिस्थिती बदलली आहे. घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त तसेच महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडण्याची निकड अनेकांना भासत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाइन खरेदी करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन आपापल्या वेळेत खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. ऑनलाइन खरेदी केल्यास किमान दुसऱ्या दिवसापर्यंत वाट बघावी लागत असल्याने आवश्यक वस्तू त्याच दिवशी घेऊन येणे सोईचे होत असल्याने पुन्हा बाजारांमध्ये जाऊन खरेदी केली जात आहे. त्यामुळे ऑनलाइनऐवजी पुन्हा ऑफलाइन, प्रत्यक्ष खरेदीवर भर दिला जात असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे.

ऑनलाइन फूडला मात्र पसंती

अद्याप हॉटेल्स, कॅफे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू जरी प्रत्यक्ष मागवण्यात येत असल्या तरी चटपटीत पदार्थांसाठी मात्र फूड डिलिव्हरी अॅप्सला पसंती दिली जात आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू राहत असल्याने हॉटेलचालकांनाही काहीसा आधार मिळाला आहे. तसेच खवय्यांनाही विविध पदार्थांचा आनंद लुटता येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Super over: सुपर ओव्हर देखील टाय होते तेव्हा कोणते नियम लागू होतात; जाणून घ्या – all you need to know super over tied repeating...

दुबई: निर्धारीत ५० किंवा २० षटकात दोन्ही संघ जेव्हा समान धावा करतात तेव्हा सामना सुपर ओव्हर (super over) मध्ये जातो. सामना टाय आणि...

PM Modi: PM मोदींनी सांगितलं, त्यांच्या कुठल्या निर्णयाने होतेय करोना रुग्णसंख्येत घट – india has one of the highest recovery rates of 88 percent...

नवी दिल्ली: भारतात सध्या करोना संसर्गाच्या ( coronavirus india ) रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि करोनातून बरे ( covid 19 india ) होण्याचे...

Recent Comments