Home शहरं नाशिक Nashik News : प्रांतांच्या वाहनाला चिकटविले निवेदन - statement affixed to the...

Nashik News : प्रांतांच्या वाहनाला चिकटविले निवेदन – statement affixed to the vehicle of the province


म टा वृत्तसेवा निफाड

शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी निफाडच्या प्रांत अर्चना पठारे या कार्यालयातून बाहेर न आल्याने संतप्त झालेल्या खासदार डॉ. भारती पवार यांनी पठारे यांच्या वाहनालाच निवेदन चिकटवून निषेध नोंदविला.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी आणि खासदार डॉ. पवार आल्या होत्या. मात्र पवारांसह भाजप पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पठारे यांनी टाळाटाळ केली, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाघ, तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, सुखदेव चौरे, जि. प. सदस्य डी. के. जगताप, प्रकाश दायमा उपस्थित होते.

निवेदन द्यायला येणार असल्याचे प्रांत पठारे यांना आधीच कल्पना दिली होती. शेतकऱ्यांना सोबत घेऊन गेल्यानंतर पाच व्यक्ती तुम्हाला निवेदन देणार आहोत, तुम्ही खाली येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या, असा निरोप दिला. मात्र तरीही त्या आल्या नाहीत. म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करून त्यांच्या वाहनाला निवेदन चिकटवले.

डॉ. भारती पवार, खासदार

मी करोनाच्या बैठकीत होते. खासदार पवार यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना ऑफिसला पाच शेतकरी घेऊन या, आपण बोलू असे सांगितले. पण त्यांनी मला ऑफिसमधून निवेदन घायला बाहेर बोलावले. मी लगेच पहिल्या मजल्यावरून खाली आले. त्यांच्यापर्यंत पाहोचत नाही तोपर्यंत त्यांनी वाहनाला निवेदन चिकटवले होते. डॉ. पवार यांचा गैरसमज झाला.

-डॉ अर्चना पाठारे, प्रांताधिकारीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारस्थानांची सत्यकथा

विवेक गोविलकर यांचे '' हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या या लेखकाला दोनदा शोध पत्रकारितेचा...

Recent Comments