Home शहरं नाशिक Nashik News : बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू - bomb blast accused...

Nashik News : बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू – bomb blast accused yusuf memon dies


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन (वय ५४) याचे शुक्रवारी सकाळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, असे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी एकामागोमाग १३ साखळी बॉम्बस्फोट होऊन २५७ जणांचे बळी गेले, तर १४०० जण जखमी झाले. भारतातील हा पहिला दहशतवादी हल्ला होता. दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन यांनी हा कट रचल्याचा आरोप आहे. या कटात युसूफ मेमन आणि त्याचा भाऊ इसाक मेमन सामील होते. त्यांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोघेही मुंबईच्या आर्थररोड, तसेच औरंगाबादच्या कारागृहात शिक्षा भोगत होते. २०१८ मध्ये त्यांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात झाली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments