Home शहरं नाशिक Nashik News : महासभेत होणार तहकूब विषयांवर चर्चा - discussions on tahkub...

Nashik News : महासभेत होणार तहकूब विषयांवर चर्चा – discussions on tahkub issues will be held in the general assembly


येत्या १८ तारखेला ऑनलाइन सभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सलग दुसऱ्यांदा महासभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १८ जून रोजी ही ऑनलाइन महासभा घेण्यात येणार असून, त्यात गेल्या नऊ महिन्यांपासून तहकूब असलेला वाढीव पाणी आरक्षण करार, सिंहस्थ कामांचा वादग्रस्त १७ कोटींच्या कामापश्चात आर्थिक मोबदला, सीबीएसई शाळांसाठी पालिकेच्या शाळा देणे अशा विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यासोबतच अधिकाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीवरही चर्चा केली जाणार आहे.

करोना संकटामुळे महासभेवर संकट आले होते. करोनाचा वाढता धोका लक्षात घेता महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या २९ मे रोजी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन महासभा घेतली होती. या महासभेत पालिकेच्या सन २०२०-२१ बजेटला मंजुरी देण्यात आली होती. या ऑनलाइन महासभेतही नगरसेवकांनी भाषणे ठोकल्याने केवळ बजेट मंजूर करण्यात आले होते. या महासभेत बजेट मंजुरीत बराच वेळ गेल्यामुळे वाढीव पाणी आरक्षण मागणी करारनामा, मनपाच्या माध्यमातून सीबीएसई शाळा सुरू करणे, सिंहस्थातील १७ कोटींच्या जादा खर्चाचा प्रस्ताव, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्ती, वृक्षगणनेच्या जादा खर्चास कार्योत्तर मान्यतेचा प्रस्ताव, शहर अभियंत्यांसह अधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती आदी विषय तहकूब ठेवण्यात आले. आता हे तहकूब व काही नियमित विषयांसाठी १९ जून रोजी पुन्हा ऑनलाइन सभा होणार असल्याचे नगरसचिव विभागाने कळवले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Samsung smartphones: सॅमसंगचे हे प्रोडक्ट्स सर्वात स्वस्त खरेदीची संधी, सेलमध्ये या ऑफर्स – samsung smartphones, galaxy watch and tablets on discounted price on amazon...

नवी दिल्लीः सॅमसंगचे नवीन स्मार्टफो खरेदी करायचा असेल किंवा नवीन व्हियरेबल, सर्वात स्वस्त खरेदीच करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स अॅमेझॉनवर सुरू असलेल्या कंपनीच्या फ्लॅगशीप,...

Aurangabad Municipal Corporation: शहरासाठी आठवड्यातून दोन चांगल्या गोष्टी करा! – Aurangabad municipal corporation will has started love Aurangabad campaign under Aurangabad smart city devlopment...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिका शहरात 'लव्ह औरंगाबाद' अभियान सुरू करणार आहे. या अभियानात सहभागी होताना प्रत्येक नागरिकाने...

Recent Comments