Home शहरं नाशिक Nashik News : ‘मामुं कनेक्शन’ तापदायक - 'mamun connection' heating

Nashik News : ‘मामुं कनेक्शन’ तापदायक – ‘mamun connection’ heating


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव, मुंबई कनेक्शनमुळे शहरातील करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ तापदायक बनली असतानाच शनिवारी याच कनेक्शनमधून आठ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी नव्याने ११ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी सकाळी आणखी दोघांना, तर सायंकाळी सहा जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील एका आरोग्यसेवकाचा मृत्युपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. नव्याने बाधित आलेले रुग्ण विसे मळा, महाराणा प्रताप चौक, शिवाजावाडी, नाइकवाडीपुरा या भागातील आहेत. दाट लोकवस्तीपाठोपाठ आता उच्चभ्रू वस्तीतही करोनाचा फैलाव होत असल्याचे चित्र असून, आठ नवीन रुग्णांमुळे शहरातील करोनाबाधितांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे . अर्थात, त्यापैकी ३९ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

कॉलेजरोडवरील विसे मळा परिसरातील एका इमारतीतील ५१ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्यास, तसेच महाराणा प्रताप चौक येथील ३४ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. तो मालेगावी ड्यूटीवर होता. काही दिवस क्वारंटाइनही होता. करोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याने खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. नंतर तो डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या कुटुंबातील पाच जण, तसेच खासगी डॉक्टरला क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यास मविप्र रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. महाराणाप्रताप चौक येथील बाधित मुंबईला गेला होता. सर्दी, तापामुळे तो खासगी दवाखान्यात दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळच्या अहवालात सहा नवीन बाधित सापडले असून, त्यात नाईकवाडीपुरा तील बाधित महिलेच्या संपर्कातील तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. शिवाजीवाडीतील किराणा दुकानदाराचा बारावर्षीय नातूही बाधित आढळला आहे.

शहरातील मृतांची संख्या चारवर

आगरटाकळी भागात राहणाऱ्या एका ५१ वर्षीय आरोग्यसेवकाचा मृत्यू झाला असून, तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्र्यंबकेश्वरमधील अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचा तो कर्मचारी आहे. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या आता चारवर गेली आहे. दरम्यान, शहरातील सागर व्हिलेज, हरिदर्शन अपार्टमेंट, धात्रक फाटा, तक्षशिला रो-हाउस, कोणार्कनगर, इंदिरानगर, तारवालानगर व अयोध्यानगरी, हिरावाडी ही प्रतिबंधित क्षेत्रे हटविली आहेत. विसे मळ्यातील रुग्णाची इमारत, महाराणा प्रताप चौकातील बाधिताच्या निवासस्थानालगतचा १०० मीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus vaccine updates: करोना लसीकरण: जगाला मिळणार दिलासा; अमेरिका घेणार ‘हा’ निर्णय – coronavirus vaccine news america will join the global corona virus vaccine...

जिनिव्हा: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून अनेक देशांमध्ये लसीकरणही सुरू झाले आहे. करोनाच्या वाढत्या थैमानाचा सामना करणाऱ्या जगातील गरीब, विकसनशील देशांना मोठा दिलासा...

coronavirus update in maharashtra: महाराष्ट्राने ओलांडला २० लाखांचा टप्पा; मात्र, ‘हा’ दिलासा कायम – maharashtra crosses 20 lakh covid-19 caseload mark with 2,886 new...

मुंबईः गेल्या नऊ महिन्यांपासून करोनाचे संसर्गाचे संकट झेलत असलेल्या महाराष्ट्रातही अजूनही काही प्रमाणात करोनाचा धोका कायम असल्याचं चित्र आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या...

भाजपच्या कर्जस्वप्नास तडा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नगरसेवकांच्या विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यावरून आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष सुरू असतानाच करोनामुळे घटलेल्या उत्पन्नाचा आधार घेत महापालिका...

broad gauge metro trains in marathwada: ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी पुढाकार कधी? – marathwada’s politician and industrial sector people should be think about broad gauge metro...

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादकमी अंतराची विभागातील शहरे जोडण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) सारख्या योजनेतून विकासाला पूरक असे चित्र पाहावयास मिळू शकते. विदर्भात...

Recent Comments