Home शहरं नाशिक Nashik News : मालेगावचे जवान सचिन मोरे शहीद - malegaon jawan sachin...

Nashik News : मालेगावचे जवान सचिन मोरे शहीद – malegaon jawan sachin more martyred


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भारत-चीन सीमेवरील लडाख भागातील गलवान खोऱ्यात सध्या तणावाची स्थिती आहे. याच भागात कर्तव्यावर असलेले मालेगाव तालुक्यातील साकुरी छाप (मोरेवाडी) येथील जवान सचिन विक्रम मोरे (वय ३६) शहीद झाल्याचे गुरुवारी (दि. २५) समोर आले. त्यांच्यामागे आईवडील, दोन विवाहित भाऊ, पत्नी व तीन मुले आहेत. मोरे शहीद झाल्याचे समजताच तालुक्यात शोककळा पसरली आहे.

भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती असून, गेल्याच आठवड्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. दरम्यान, गुरुवारी लडाख विभागातील सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी फोनवरून सचिन यांच्या घरी सचिन शहीद झाल्याची माहिती दिली. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गेल्या एक-दीड वर्षापासून लडाख येथे कार्यरत होते. ते ११५ इंजिनीअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याकडून एका पुलाचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी सचिन संरक्षणासाठी कार्यरत होते. दरम्यान, या भागातील नदीला चीनकडून अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढल्याने दोन जवान त्यात वाहून जात होते. त्यांना वाचवण्यासाठी सचिन यांनी पाण्यात उडी घेतली. या वेळी दोघांना वाचवताना त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याची माहिती सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला दिली.

सचिन शेतकरी कुटुंबातील असून, करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि भारत-चीन सीमेवरील परिस्थिती यामुळे काही दिवसांपासून मोरे कुटुंबीय चिंतेच्या सावटाखाली होते. लडाख या अतिदुर्गम भागात सचिन कार्यरत असल्याने अनेक वेळा संपर्क होत नव्हता. अशातच गुरुवारी अचानक ते शहीद झाल्याचे वृत्त आल्याने कुटुंबातील सगळ्यांना दु:ख अनावर झाले. घटनेची माहिती मिळताच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तसेच परिसरातील नागरिकांनी मोरेवाडी येथे धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. सचिनचे पार्थिव शनिवारी साकुरी येथे आणण्यात येणार असून, तेथेच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ३२४ नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू – nashik reported 324 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात करोना संशयितांची संख्याही वाढत असून, तब्बल १,२४८ अहवाल प्रलंबित म्हणजेच रांगेत आहेत. शुक्रवारी ३२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...

coronavirus in aurangabad: जेवणास विलंबामुळे करोनाबाधित रस्त्यावर – corona patients came to road due to they not getting lunch in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना महापालिकेतर्फे चहा-नाष्टा व जेवण दिले जाते. किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारचे जेवण...

Recent Comments