Home महाराष्ट्र Nashik News: मालेगावात युनानी डॉक्टरसह दोघांचा करोनाने मृत्यू - coronavirus updates: unani...

Nashik News: मालेगावात युनानी डॉक्टरसह दोघांचा करोनाने मृत्यू – coronavirus updates: unani doctor and old man dies of coronavirus


नाशिक: नाशिकमध्ये करोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावमध्ये स्थिती गंभीर बनत चालली आहे. मालेगावात आणखी दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यात एका युनानी डॉक्टर महिला व वृद्धाचा समावेश असून या घटनेने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

सोमवारी येथील सामान्य रुग्णालय व जीवन हॉस्पिटल येथे उपचार घेणारे दोन रुग्ण करोनामुळे दगावले. आज पहाटे ४ वाजता सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली कुंभारवाडा परिसरातील ५४ वर्षीय युनानी डॉक्टर महिला करोनाने मृत पावली. तसेच जीवन हॉस्पिटलमध्ये मुस्लिमनगर गल्ली नं. ३ मधील ५५ वर्षीय रुग्ण दगावला आहे. त्याआधी रविवारी जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला ३५ वर्षीय कमालपुरा भागातील रुग्णाचा मृत्यू झाल्याने मालेगावी चिंता वाढली आहे.

शहरात एकीकडे करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याचवेळी करोनामुळे मृत होत असलेल्या रुग्णांचा संख्येत वाढ होते आहे. येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८५ झाला आहे तर आत्तापर्यंत ८ जण दगावले आहेत. गेल्या चोवीस तासात ३ रुग्ण दगावले आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sonography centre in aurangabad: सोनोग्राफी केंद्रांवर आता जिल्हाप्रशासनाची नजर – nashik district administration will watch on sonography centre

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसोनोग्राफी केंद्रामध्ये तीन ते चार महिने गर्भवती असलेली महिला अचानक तपासणीस येणे बंद कसे होते, याबाबत लक्ष देण्यात येणार आहे....

Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या राज्यातील पाच क्रिकेटपटूंचा होणार नागरी सत्कार – india tour of australia five cricketers will be honored by state...

हायलाइट्स:ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवलेल्या संघात चार खेळाडू राज्यातीलया खेळाडूंचा नागरी सत्कार करण्याची मनसेची मागणीक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीक्रीडा...

Recent Comments