Home शहरं नाशिक Nashik News : लहान कंपन्या बंद; मोठ्या उद्योगांना गती - small companies...

Nashik News : लहान कंपन्या बंद; मोठ्या उद्योगांना गती – small companies closed; accelerate large industries


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘निसर्ग’ वादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी तीन वाजेनंतर सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील कारखाने बंद ठेवण्याबाबतचे आवाहन ‘आयमा’तर्फे करण्यात आले. त्यास काही लहान कारखान्यांनी प्रतिसाद देत उत्पादन बंद ठेवले. मात्र, मोठे कारखाने सुरळीत सुरू होते.

वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हावासीयांसाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्या आवाहनानुसार ‘आयमा’च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांच्याशी चर्चा केली. बहुतांश कंपन्यांतील कामगार दूरवरील उपनगरांतून सायकल तथा दुचाकीवरून एमआयडीसीत कामावर येतात. या कामगारांच्या जीविताला वादळामुळे धोका पोहचू नये, ते सुरक्षित घरी पोहचावेत यासाठी सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील सर्व उद्योग दुपारनंतर बंद ठेवण्याबाबत आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी भामरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यानंतर ‘आयमा’च्या वतीने सोशल मीडियाद्वारे ही माहिती उद्योगांपर्यंत पोहचविण्यात आली. याला काही कारखान्यांनी प्रतिसाद दिला. मात्र, मोठ्या उद्योगांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते.

वादळापासून बचाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्या अनुषंगाने उद्योजकांशी चर्चा केली. त्यानुसार कामगार वेळेत घरी पोहचावेत यासाठी कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL points table: IPL2020: सलग तीन विजयानंतर पंजाबने घेतली गुणतालिकेत मोठी झेप, पाहा काय झाला बदल – ipl2020: kings eleven punjab took 5th position...

दुबई : आज किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने आयपीएलमधील विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. आजच्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाबच्या संघाने मोठा धक्का दिला. त्यामुळे...

Recent Comments