Home शहरं नाशिक Nashik News : लॅबमधील कामकाज सामग्रीअभावी ठप्प - lack of working materials...

Nashik News : लॅबमधील कामकाज सामग्रीअभावी ठप्प – lack of working materials in the lab


मंगळवारपर्यंत स्वॅब तपासणी बंद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वॅब तपासणीसाठी आवश्यक असलेली सामग्री (कन्झ्युमेबल्स) उपलब्ध न झाल्याने आडगाव येथील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या लॅबमधील स्वॅब तपासणीचे काम शुक्रवारी सायंकाळपासून ठप्प झाले आहे. मंगळवारी ही सामग्री प्राप्त होणार असून, लॅब पुन्हा कार्यान्वित होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

संशयित रुग्णांचे स्वॅब तपासण्यासाठी लॅबमध्ये काही साधनसामग्रीची आवश्यकता असते. या साधनसामग्रीचा तुटवडा जाणवू लागल्याने ती मागविण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी ही सामग्री प्राप्त होणार होती. परंतु, विमान रद्द झाल्याने ही सामग्री प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून स्वॅब तपासणीचे काम थांबले आहे. मंगळवारी ही सामग्री मिळणार असून, तोपर्यंत या लॅबचे काम बंद राहणार आहे. त्यानंतर ही लॅब कार्यान्वित होईल, असे मांढरे यांनी सांगितले. दरम्यान, धुळे येथील प्रयोगशाळेमध्ये नाशिकसाठी तीनशे स्वॅब तपासणीचा कोटा राखीव असल्याने जिल्ह्यातील स्वॅब तपासणीसाठी धुळ्याला पाठविले जात आहेत. सद्यस्थितीत प्राप्त होणाऱ्या स्वॅबची संख्याही कमी असल्याने अहवाल मिळविण्यात अडचण येत नसल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले. यापुढील काळात साधनसामग्रीचा तुटवडा भासू नये, याकरिता पुढील महिनाभराची सामग्री आतापासूनच उपलब्ध करून घ्या, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना दिल्याची माहिती मांढरे यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Recent Comments