Home शहरं नाशिक Nashik News : शेअर बाजाराकडे वाढला कल - the upward trend towards...

Nashik News : शेअर बाजाराकडे वाढला कल – the upward trend towards the stock market


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चअखेरीस लॉकडाउन सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे व्यवसाय ठप्प होते. या काळात घरबसल्या पैसे मिळविण्याचे एकमेव साधन म्हणून व्यापाऱ्यांसह सामान्यांचाही शेअर बाजाराकडे कल वाढला. या काळात विविध ब्रोकरेज कंपन्यांच्या डीमॅट खात्यांमध्ये तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.

झीरोधा ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीच्या डीमॅट खाते उघडण्याच्या प्रमाणात लॉकडाउनपूर्वीच्या तुलनेत एप्रिल-मे मध्ये शंभर टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. कंपनीच्या दररोजच्या व्यवहारांतही ८० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नाशिकमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे डीमॅट खाते उघडण्याची संख्या २०० टक्क्यांनी वाढली आहे. लॉकडाउनदरम्यान पैसे कमाविण्याचे भाजी बाजार आणि शेअर बाजार असे दोनच मार्ग होते. व्यवसाय बंद असल्यामुळे तसेच या दरम्यान शेअर बाजार बऱ्यापैकी खाली आल्यामुळे गुंतवणुकीची संधी हेरून व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी घरबसल्या शेअर बाजारात ट्रेडिंगला प्राधान्य दिले. डीमॅट खाते उघडून शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करणाऱ्यांमध्ये रिक्षाचालक, हातगाडीवाले, शिक्षक, प्राध्यापक आदींचेही प्रमाण मोठे असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. झीरोधासह आयसीआयसीआय डायरेक्ट, एचडीएफसी सिक्युरिटीज, अपस्टॉक्स, एंजल ब्रोकिंग, कोटक सिक्युरिटीज, फाइव्ह पैसा, मोतीलाल ओसवाल, शेअरखान, एसबीआय सिक्युरिटीज, अॅक्सिस डायरेक्ट, कार्व्ही आदी प्रमुख संस्थात्मक ब्रोकर्स आहेत. याव्यतिरिक्त व्यक्तिगत ब्रोकर्सची संख्या मोठी आहे.

वेबिनार्सचा मारा

या काळात शेअर बाजाराविषयी मार्गदर्शक कार्यक्रमांचा ब्रोकर्सनी भडिमार केला. शिवाय, फेसबुक लाइव्ह, वेबिनार्सच्या माध्यमातूनही ग्राहकांचे वर्ग घेण्यात आले. घरबसल्या उत्पन्नाचा मार्ग म्हणून अनेकांनी अशा वेबिनारमध्ये सहभागी होत, काहींनी शेअर बाजाराचे ऑनलाइन कोर्सेसलाही हजेरी लावली. यातून अनेकांचा कल बाजारात गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे.

परदेशी गुंतवणुकीत वाढ

मोतीलाल ओसवाल सिक्युरिटिजचे सुरेश लोया यांनी वेगळे मत नोंदविले. ते म्हणाले की, गुंतवणूकदार वाढले असले तरी लॉकडाउन काळात परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने फटका बसला. मात्र, आता त्यांनी विक्री थांबवली असून, खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे बाजार चांगल्या स्थितीत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rr vs csk live score: Chennai Super Kings vs Rajasthan Royals 37th Match IPL Live Cricket Score Updates From Sheikh Zayed Stadium – CSK...

अबुधाबी:IPL 2020 अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएल २०२० मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR)अशी लढत होत आहे. गुणतक्त्यात...

final year exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा – mumbai university final year exams 2020 ended successfully, over...

Mumbai University Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५...

Recent Comments