Home शहरं नाशिक Nashik News : संसर्गाचा वेग नाशकात अल्प - the rate of infection...

Nashik News : संसर्गाचा वेग नाशकात अल्प – the rate of infection is low in nashik


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक शहर आणि जिल्ह्यात करोना संसर्ग पसरण्याचा वेग कमी आहे. याशिवाय रुग्णसंख्या दुप्पट व्हायला जेवढा वेळ लागतो तोदेखील केरळपेक्षा कमी असल्याचे निरीक्षण मुंबई विद्यापीठाने नोंदविले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संशोधनात तथ्य असल्याचे सांगत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी त्यास दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्रात करोना संसर्गाचे रुग्ण आढळू लागले तेव्हापासून मुंबई विद्यापीठाने त्याबाबतची निरीक्षणे नोंदविण्यास सुरुवात करून त्याचा आढावा घेतला. विद्यापीठाशी संबंधित नीरज हद्देकर यांनी नाशिकमधील ‘रीप्रोडक्शन रेट’बद्दल माहिती दिली आहे. एक बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करते याचा अहवाल ‘रीप्रोडक्शन रेट’ असतो. हा रेट केरळपेक्षा कमी झाला आहे. ‘रीप्रोडकशन रेट’ जेवढा कमी तेवढा लवकर करोनावर ताबा मिळविण्यात यश येत असल्याचे हद्दीकर यांनी म्हटले आहे. याशिवाय रुग्णसंख्या दुप्पट व्हायला जो वेळ लागतो तोदेखील केरळच्या तुलनेत वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही निकषांवर नाशिकमध्ये करोना संसर्गाला अटकाव करण्यात प्रगती दिसत असून, ही नाशिककरांना दिलासा देणारी बाब आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निरीक्षणाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. बाधित रुग्णांवर वेळेत उपचार आणि संसर्ग समाजात पसरू न देण्याबाबत घेतलेली काळजी यामुळे शहर आणि जिल्ह्याचा ‘रीप्रोडक्शन रेट’ कमी झाला आहे. साथ पसरण्याआधीच उपाययोजना आणि उपचार करण्यात आल्याने दुपटीचा वेग वाढल्याचे म्हणजेच रुग्णसंख्या दुप्पट होण्यास अधिक अवधी लागल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments