Home शहरं नाशिक Nashik News : स्वॅब घेणारा डॉक्टरच बाधित - only the doctor taking...

Nashik News : स्वॅब घेणारा डॉक्टरच बाधित – only the doctor taking the swab is affected


B

टीम मटा

जिल्ह्यात मालेगावसह मनमाड, येवला, तसेच निफाड तालुक्यात शनिवारी नऊ रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. मनमाडमध्ये स्वॅब घेणाऱ्या डॉक्टरलाच करोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे, तर येवल्यात बलात्कार प्रकरणातील एक तरुण करोनाबाधित आढळला आहे.

मालेगावात एकाचा मृत्यूB

मालेगाव : शहरात शनिवारी चार नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे मालेगाव शहरातील करोनाबाधितांची संख्या ६८९ झाली आहे, तर शनिवारी ६६ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला. येथील प्रशासनास शनिवारी सायंकाळपर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. त्यानंतर रात्री उशिरा येथील प्रशासनास ४९ अहवाल प्राप्त झाले. यात ४५ अहवाल निगेटिव्ह, तर चार करोना बाधित रुग्ण आढळले. शहरात दोन संशयित रुग्णांचाही मृत्यू झाला असून त्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

मनमाडच्या चिंतेत भर

मनमाड : नमाड शहरात शनिवारी आणखी दोन जणांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहराच्या चिंतेत भर पडली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेणाऱ्या डॉक्टरचाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यासह आंबेडकर चौक भागातील २३ वर्षीय महिलादेखील करोनाबाधित आढळली आहे. मनमाड शहरातील बाधित रुग्णांची संख्या आता दहा, तर तालुक्यातील बाधितांची संख्या १२ झाली आहे. दरम्यान करोना बाधित २३ वर्षीय तरुणी ही मालेगाव चौफुली परिसरातील झोपडपट्टीतील बाधित रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगितले जात आहे.

बलात्कार प्रकरणातील तरुण बाधित

येवला : येवला तालुक्यातील सर्वच ३२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने सुस्कारा सोडला असतानाच दोन दिवसांत येवला तालुकावासीयांना पुन्हा हादरा बसला आहे. बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाची सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यापूर्वी आवश्यक असलेली करोना चाचणी केली असता हा तरुण करोनाबाधित आढळला. येवला तालुक्यातील कानडी येथील रहिवासी असलेला हा तरुण करोनाबाबत कुठल्याही संपर्क साखळीशी जोडला गेलेला नसताना तो करोनाबाधित निघाल्याने येवल्यात खळबळ उडाली आहे. त्याला १९ फेब्रुवारीत एका तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता. न्यायालयीन कोठडीत असताना त्याची तपासणी केली असताना तो पॉझिटिव्ह आढळला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sanjay Chavan: ‘ती’ जमीन सरकारकडे जमा करा – tehsildar shubham gupta has directed that land should be in the name of the government to...

म. टा. वृत्तसेवा, सटाणाबागलाणचे माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण हे आदिवासी नसल्याने त्यांना आदिवासींकडून खरेदी केलेल्या तालुक्यातील ठेंगोडा शिवारातील उमाजी नगर येथील सातबाऱ्यावरील...

more psu in pipeline for disinvestment: Budget 2021 आणखी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण ; सोमवारी अर्थमंत्री करणार ‘बजेट’मध्ये घोषणा – finance minister unveil privatization plan...

हायलाइट्स: कॅबिनेटच्या बैठकीत खासगीकरण धोरणाला मंजुरी गेल्या वर्षी अर्थसंकल्पात २.१ लाख कोटींची निर्गुंतवणूक योजनाआगामी अर्थसंकल्पात किमान पाच कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूकनवी दिल्ली : सार्वजनिक...

dhavalsinh mohite patil joins congress: Dhavalsinh Mohite Patil: काँग्रेसची खेळी; बिबट्याला टिपणाऱ्या ‘या’ शूटरच्या निशाण्यावर आता भाजप! – dhavalsinh mohite patil from solapur joins...

हायलाइट्स:सोलापुरातील मोहिते पाटील घराण्यातील धवलसिंह काँग्रेसमध्येमुंबईत टिळक भवन येथे झाला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमभाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने खेळली मोठी खेळीमुंबई: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गतवैभव...

Recent Comments