Home आपलं जग हेल्थ national doctors day 2020 : National Doctors Day फिट आणि सकारात्मक राहण्यासाठी...

national doctors day 2020 : National Doctors Day फिट आणि सकारात्मक राहण्यासाठी करोना योद्धांचा फिटनेस फंडा – what doctors do to keep themselves healthy national doctors day in marathi


रामेश्वर जगदाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा सामान्य नागरिकांना दिलासा देणारे डॉक्टर्स करोना नामक संकट पळवून लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी करोना योद्ध अविरत सेवा देत आहेत. ‘आपण फिट राहिलो तर इतर नागरिकांना करोनाच्या संसर्गापासून वाचवू शकतो’ असा विचार करुन डॉक्टर्स स्वत:ला फिट आणि सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आहारात बदल करून, योगसाधना आणि ध्यानधारणा सारख्या पर्यायांचा अवलंब करुन डॉक्टर्स स्वत:चं आरोग्य जपत आहेत.

(सावधान! करोना व्हायरसनंतर चीनमध्ये सापडला आणखी एक नवीन व्हायरस)

डॉ. शिवानी गुंजाळ ही होमिओपॅथी डॉक्टर म्हणून कोविड रुग्णांची सेवा करत आहे. ‘वाढती रुग्ण संख्या आणि अपुरं मनुष्यबळ यामुळे खासगी व पालिका रुग्णालयांमध्ये ड्युटी लावल्या जातात. यामुळे जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळेत बदल करावा लागतोय. अशा कठीण काळात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आहारात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करत आहे. हॉस्पिटलमध्येच संपूर्ण दिवस जातो. त्यामुळे इतर गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. आम्ही रुग्णांना जो सल्ला देतो त्याचं आम्हीसुद्धा पालन करतो’, असं डॉ. शिवानी गुंजाळ सांगतात.

(Coronavirus Prevention करोना व्हायरस तुमच्या जवळही येणार नाही, लक्षात ठेवा ७ या गोष्टी)

डॉ. तुषार पवार सध्या आयुर्वेदिक सर्जन म्हणून कोविड रुग्णांची सेवा करत आहे. ते सांगतात की, ‘कामाच्या वेळा बदलत असतात. त्यामुळे त्या वेळेनुसार आपलं वेळापत्रक बनवावं लागतं. असं सगळं असलं तरीही सकाळी उठल्यावर ध्यानधारणा आणि व्यायाम करण्यास प्राधान्य देतो. तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणं टाळतो. रात्रीची ड्युटी असेल तर सकाळी जरा सायकलवरून फेरफटका मारून येणं, चालायला जाणं अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न असतो. आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे दिनचर्या आणि ऋतुचर्या असं दोन्ही सांभाळून आहार घेतो आणि स्वतःला सकारात्मक ठेवतो’.

(Coronavirus New Symptoms : तुमच्या डोळ्यांची अशी अवस्था झालीय का?)
‘येण्या-जाण्याची निश्चित अशी वेळ नाही. पण सात दिवस काम आणि त्यानंतर सात दिवस घरीत क्वारंटाइन होणं, असं चक्र सध्या सुरु आहे. अशा वेळेतसुद्धा सकारात्मक राहण्यासाठी टीव्हीवरील एखादा कॉमेडी शो बघते. घरी बनवलेलं आणि पौष्टिक आहार घेण्यावर भर देते. सकाळी काम सुरु करण्यापूर्वी हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारते’, असं अॅनेस्थेशिया स्पेशालिस्ट डॉ. मानसी वैद्य सांगते.

डॉ. रैवत बगाडिया हे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून कोविड कक्षात रुग्णांना सेवा देत आहेत. ‘सध्या स्वतःला फिट ठेवण्याबरोबर रोगालासुद्धा जवळ करायचं नाही अशी दुहेरी लढाई सुरु आहे. तरीही जेवण वेळेवर घेण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी उठल्यावर नित्यनेमाने किमान १५ मिनिटं तरी स्वतःसाठी काढतो. या वेळेत योग आणि ध्यानधारणा करतो. कामावर जाताना उपाशी पोटी जाणं प्रकर्षानं टाळतो. मानसिक आरोग्य जपण्यासाठी इतर डॉक्टर मित्र आणि घरच्यांबरोबर संवाद साधतो’, असं डॉ. रैवत सांगतात.

(Coronavirus Test करोना चाचणीसाठी अँटिजेन टेस्टिंग, ३० मिनिटांत मिळणार मेडिकल रिपोर्ट)
जनरल सर्जन डॉ. विशाल पोखरकर सांगतात की, ‘लांब राहत असल्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. सकाळी योग आणि श्वसनाचे व्यायाम करणं आणि भरपूर फळाचं सेवन करणं यावर भर असतो. घरचं खाण्यास प्राधान्य देतो. रुग्णांना मानसिकरित्या सकारात्मक ठेवणं आणि त्याच्या जोडीला आम्ही स्वत:सुद्धा सकारात्मक असणं काळाची गरज आहे. यासाठी कॉमेडी शो आणि कार्टून बघतो. कामाच्या व्यापात थोडा निवांत वेळ मिळाला की खेळतो. त्यामुळे ऊर्जा मिळते’.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Recent Comments