Home महाराष्ट्र nationwide protest : 'कामगारांनो, घराच्या दरवाज्यात, बाल्कनीत या... निषेध करा' - citu...

nationwide protest : ‘कामगारांनो, घराच्या दरवाज्यात, बाल्कनीत या… निषेध करा’ – citu called for nationwide protest on april 21, maharashtra anganwadi workers to join protest


मुंबई: ‘करोनाच्या संकटानं देशात थैमान घातलेलं असताना, केंद्र सरकारनं कामगार, कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. उलट त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. सरकारच्या या कारभाराविरोधात उद्या, २१ एप्रिल रोजी देशव्यापी निषेध दिवस पाळण्यात येणार असून सर्व कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसह घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत उभं राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Live: राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

सेंटर ऑफ ट्रेड इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) संघटनेनं या निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेनंही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. ‘पंतप्रधान केवळ टीव्हीवर येऊन पोकळ भाषणे देत आहेत. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे याची माहिती देण्याऐवजी लोकांनाच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देत आहेत आणि त्यांच्यावरच विविध जबाबदार्‍या टाकत आहेत. याचा निषेध या आंदोलनातून करण्यात येणार आहे.

वाचा: संजय राऊतांना आशिष शेलारांचं जशास तसं उत्तर

‘सीटू’नं आंदोलकांच्या मागण्यांची यादीच जाहीर केली असून बाल्कनीत, दरवाज्यासमोर वा अंगणात उभे राहणाऱ्यांनी या मागण्यांचे फलक हातात घ्यावेत. सोशल डिस्टन्स व लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून हे निषेध प्रदर्शन करावं, असं सांगण्यात आलं आहे. आंदोलकांनी घोषणा देऊन त्याचे व्हिडिओ किंवा फोटो काढून व्हाॅट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर अपलोड करावेत, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

वाचा: ‘बाळासाहेब अन् उद्धव यांच्या राज्यात हाच फरक’

आंदोलकांच्या मागण्या

> भाषण नको, रेशन हवे, वेतन हवे!

>> प्रत्येक बिगर आयकरदाता कुटुंबाला ३ महिने मासिक ७५०० रुपये आर्थिक मदत मिळालीच पाहिजे

>> करोना तपासणी व उपचाराची गती वाढवा व उपचारांची मोफत व्यवस्था करा.

>> लॉकडाऊनच्या काळात कामगार किंवा वेतन कपात चालणार नाही

>> सर्व आरोग्य व पोषण आदी प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साधने, विशेष प्रोत्साहन भत्ता द्या.

>> संकटकाळात सार्वजनिक सेवा देणाऱ्या अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तकांना कायम शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.

>> अडकून पडलेल्या सर्व स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोफत वाहतुकीची व्यवस्था करा.

वाचा: ‘फडणवीस साहेब, मुख्यमंत्र्यांना काम करू द्या’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Recent Comments