Home मुंबई नवी मुंबई Navi Mumbai lockdown: एका आठवड्यासाठी 'या' शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू - 7...

Navi Mumbai lockdown: एका आठवड्यासाठी ‘या’ शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू – 7 days lockdown in navi mumbai again


नवी मुंबईः लॉकडाउन शिथिल केल्यानंतर नवी मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. नागरिक चिंताग्रस्त झाल्यामुळे शहरात दहा कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. २९ जून ते ५ जुलैपर्यंत या भागांत लॉकडाऊन लागू करण्यात आला असून यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंटेनमेंट झोनची यादी आणि निर्बंध याची माहिती दिली आहे. कंटेनमेंट झोन असणाऱ्या या ठिकाणी तसंच त्याच्याबाहेर लोकांनी प्रवास टाळावा तसंच या भागात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावं अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

वाचाः आज राज्यात ५ हजार बाधित सापडले, रुग्ण संख्या दीड लाख पार, १७५ दगावले

नवी मुंबईत करोना रुग्णांचा आकडा ५ हजारांच्यावर असून १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या बैठकीत खासदार राजन विचारे, पोलिस आयुक्त संजय कुमार, महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ उपस्थित होते. सध्या शहरात ३४ कंटेनमेंट झोन आहेत. करोनाचा वाढता प्रसार पाहून पालिकेनं आणखी दहा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत.

पालिकेनं जाहीर केलेले कंटेन्मेंट झोन

दिवाळे गाव

करावे गाव

तुर्भे स्टोअर

सेक्टर २१ तुर्भे

सेक्टर २२ तुर्भे

सेक्टर ११ जुहुगाव

बोनकोडे गाव, सेक्टर १२ खैरणे

सेक्टर १९ कोपरखैरणे गाव

रबाळे गाव

चिंचपाडा

वाचाः प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यताSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ind vs Aus highlights: Australia vs India 4th Test: ऑस्ट्रेलियात भारत ‘अजिंक्य’; यजमानांचा घरच्या मैदानावर इतिहासातील मोठा पराभव – australia Vs India 4th Test...

ब्रिस्बेन: India win at Brisbane अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने ०० विकेटनी विजय...

msedcl bill recovery latest news: MSEDCL Bill Recovery: लॉकडाऊन काळातील सहानुभूती संपली!; वीज ग्राहकांना महावितरण देणार ‘शॉक’ – msedcl will cut off power supply...

मुंबई:वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिले आहेत....

Recent Comments