Home मुंबई नवी मुंबई Navi Mumbai municipal commissioner: आयुक्तांच्या बदलीला दुसऱ्या दिवशी स्थगिती! - postponement of...

Navi Mumbai municipal commissioner: आयुक्तांच्या बदलीला दुसऱ्या दिवशी स्थगिती! – postponement of commissioner’s transfer on the next day!


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मंगळवारी करण्यात आलेल्या बदलीला दुसऱ्याच दिवशी, बुधवारी राज्य सरकारने स्थगिती दिली. करोनाबाबतच्या काही निर्णयांमुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा मंगळवारी रंगली होती.

महापालिका आयुक्तपदासोबतच प्रशासकपदाची जबाबदारीही मिसाळ यांच्याकडेच आहे. आयुक्तपदावरून हटवताना त्यांना प्रशासक म्हणूनही हटवावे लागेल. त्यासाठी निवडणूक आयोगाचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. मात्र तसे झाले नसल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीवर आक्षेप घेतला होता, असे कळते. मिसाळ यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे घातल्यानंतर बदलीला स्थगिती मिळाली, असे बोलले जाते. गुरुवारी त्यांनी महापालिकेत येऊन नेहमीसारखे कामही केले.

मिसाळ यांनी जुलै २०१९मध्ये नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहायला सुरुवात केली. नवी मुंबई महापालिकेत त्यांना केवळ ११ महिनेच झाले होते. मे महिन्यात सध्याच्या महापालिकेची मुदत संपली असली तरी करोनामुळे येथील महापालिका निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे मिसाळ हे महापालिकेवर सध्या प्रशासक म्हणूनही कार्यरत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments