Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला - the moment of akshayya...

navi mumbai News: अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला – the moment of akshayya tritiya was missed


म. टा. प्रतिनिधी, पुणे

वर्षातील साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया हा सण यंदा रविवारी आला असला, तरी लोकांना खरेदीला बाहेर पडता येणार नाही. लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच बाजारपेठा बंद असल्याने गुढीपाडव्या पाठोपाठ अक्षय्य तृतीयेचा खरेदीचा मुहूर्तही हुकला आहे. घरी बसून हंगामातील पहिला आंबा खाण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे.

करोना साथीमुळे गेल्या महिनाभरापासून देशभरात लॉकडाउन असल्याने सर्व बाजारपेठा बंद आहेत. एरवी मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला आणि अक्षय्य तृतीयेला नागरिक घर खरेदी, सोने अथवा वाहन खरेदीचा मुहूर्त निवडतात. या दिवशी मुंजीचेही कार्यक्रम होतात. उन्हाचा तडाखा वाढलेला असला, तरी या सणाला बाजारपेठ गजबजलेली असते. या वर्षी गुढीपाडव्याला लॉकडाउन असल्याने अनेकांनी त्यांचे खरेदीचे बेत अक्षय्य तृतीयेपर्यंत पुढे ढकलले होते. मात्र, करोनाची साथ अद्याप नियंत्रणात आली नसल्याने प्रशासनाने लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. परिणामी अनेकांचे वाहनखरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा नवीन घराचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. काही सराफी व्यावसायिकांनी अक्षय्य तृतीयेचे वेढणे खरेदीचा ऑनलाइन पर्याय उपलब्ध केला आहे. ग्राहकांनी खरेदी केलेले वेढणे लॉकडाउननंतर त्यांना मिळणार आहे. इतर बहुतांश बाजारपेठा पूर्णच बंद राहणार आहेत.

हंगामातील पहिला आंबा

अनेक घरात अक्षय्य तृतीयेला हंगामातील पहिली आंब्याची पेटी आणून देवाला आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. या वर्षी लॉकडाउनमुळे शहरात ठिकाठिकाणी होणारे आंबा महोत्सव झालेले नाहीत; पण अनेक आंबा उत्पादक, व्यावसायिकांनी ऑनलाइन आंबाविक्री आणि घरपोच डिलिव्हरीची सोय केल्यामुळे नागरिकांनी आंबा खरेदी केली आहे; तर काहींनी शनिवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत जवळच्या बाजारातून आंबे आणले. अक्षय्य तृतीयेला दर वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात; तसेच इतर लहान मोठ्या मंदिरात आंब्याची आरास केली जाते. हा प्रसाद नंतर भाविकांना दिला जातो. करोनाच्या साथीमुळे मंदिरे बंद असल्याने मंदिरातील आंबा महोत्सव रद्द करण्यात आले आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

MNS Morcha against Electricity Bills: MNS Morcha Against Inflated Electricity Bill Live Updates – MNS Morcha Live: मनसेचा झटका मोर्चा; राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर

सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर...

ed inquiry in private firm in nashik: नाशिकच्या दोन संस्थाची ‘ईडी’कडून चौकशी – enforcement directorate investigation in cooperative organization and private firm over economic...

आर्थिक गैरव्यवहार व व्यवहारांमधील अनियमितता प्रकरणांत मातब्बरांना घाम फोडणाऱ्या 'ईडी'चे (enforcement directorate ) पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे.  Source link

Recent Comments