Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: अर्थचक्र फिरलेच पाहिजे - the economy must rotate

navi mumbai News: अर्थचक्र फिरलेच पाहिजे – the economy must rotate


म टा विशेष प्रतिनिधी, मुंबई’राज्यात लॉकडाउन जाहीर होऊन सोमवारी सहा आठवडे पूर्ण होतील…

Updated:

MT

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘राज्यात लॉकडाउन जाहीर होऊन सोमवारी सहा आठवडे पूर्ण होतील. या काळात करोनामुळे राज्याचे जे अर्थचक्र रुतले आहे, ते परत फिरलेच पाहिजे. त्यासाठी पुन्हा गणपती बाप्पा मोरया म्हणूया,’ असे सांगताना करोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रीन आणि ऑरेंज विभागामध्ये येणाऱ्या काही जिल्ह्यांतील उद्योगांना माफक स्वरुपात परवानगी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. मात्र, या जिल्ह्यांत मालवाहतूक सुरू राहील, विषाणूची वाहतूक होणार नाही. त्यामुळे दोन जिल्ह्यांमध्ये मालवाहतूक करता येणार नाही. शिवाय, सर्वसामान्यांसाठीही जिल्हाबंदी कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला. या वेळी त्यांनी करोनाच्या संकटाची नागरिकांना जाणीव करून देतानाच राज्यासमोरच्या आर्थिक संकटाचीही जाणीव करून दिली. गेल्या महिन्यात २० तारखेला सर्व बंद झाले. करोनामुळे आपले रुतलेले अर्थचक्र पुन्हा फिरलेच पाहिजे. त्यासाठी उद्यापासून काही ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा मोरया म्हणावेच लागेल. आपण करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन विभाग तयार केले आहेत. त्यापैकी ग्रीन आणि ऑरेंज विभागामध्ये माफक प्रमाणात उद्योग सुरू करता येईल. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात मालाची ने-आण करता येईल. मात्र, कुणालाही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. जिल्हाबंदी कायम असेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच कामगारांची कारखान्याच्या आवारात काळजी घेत असाल तर राज्य सरकार तुम्हाला मदत करेल, असेही ठाकरे यांनी सांगितले. ‘एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. ३ मेपर्यंत ही बंदी कायम असेल. मी मालवाहतुकीला अंशत: परवानगी दिली आहे. मालवाहतूक होणार आहे. मला विषाणूची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका पत्करायचा नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

संबंधित वृत्त…

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments