Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : आयुर्वेदाची मात्रा ठरलीकरोनावर उपयुक्त - useful in ayurvedic...

navi mumbai News : आयुर्वेदाची मात्रा ठरलीकरोनावर उपयुक्त – useful in ayurvedic dosage


म. टा. प्रतिनिधी, पुणे

करोनासदृश लक्षणे आढळलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती व्हेंटिलेटर लावण्यापर्यंत खालावलेली असताना आय़ुर्वेदाच्या मात्रेमुळे त्यांना जीवदान मिळाले. त्यामुळे करोनाग्रस्तांवर अॅलोपॅथीसह आयुर्वेदाची मात्रा उपयुक्त ठरत असल्याचे आढळून आले आहे.

पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाचा ताप आणि खोकला वाढला. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांना करोनासदृश लक्षणे आढळून आली. त्यामुळे फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एका खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यांना संसर्ग झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र, त्यांच्या नातेवाइकांच्या आग्रहानुसार त्यांच्यावर आयुर्वेदाचे उपचार सुरू करण्यात आले.

वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, ‘हे रुग्णालय आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नातेवाइकांच्या जबाबदारीवर आयुर्वेदाच्या उपचारास परवानगी दिली. एका बाजूला ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांच्या जोडीने आयुर्वेदाची औषधे देण्यात आली. या गुंतागुंतीच्या स्थितीत आयुर्वेदाच्या औषधांची मात्रा परिणामकारक ठरू लागली. व्हेंटिलेटर लावण्याची गरज कमी झाली. हळूहळू कृत्रिम पद्धतीने दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणाची गरज कमी होऊन रुग्ण स्वतःहून श्वास घेऊ लागला. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेला रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊ शकला.’

वैद्य बेंडाळे म्हणाले, ‘या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात एकूण २६ व्यक्ती राहतात. ते सर्व त्यांच्या संपर्कात असल्याने त्यांनाही या संसर्गाची लागण झाली होती. २६ पैकी ११ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्यापैकी ८ जणांना कोणतीही लक्षणे नव्हती; तर काहींना सौम्य लक्षणे होती. विशेष म्हणजे एकाच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात सर्वच व्यक्ती असताना त्यांना आढळून येणारी लक्षणे मात्र वेगवेगळी होती. तरुणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यास त्यांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता कमी असते. तसेच त्यांच्यावर आयुर्वेदाचे उपचार उपयुक्त ठरतात. आयुर्वेदाच्या उपचाराने विषाणू प्रतिबंधक उपचाराऐवजी थेट विषाणू नष्ट केले जातात. रसायना ही आय़ुर्वेदाची स्वतंत्र शाखा आहे. यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होतेच; त्याशिवाय थेट विषाणूंपासून संरक्षण देण्याचे काम केले जाते.’

करोनाच्या संसर्गामुळे जगात मृत्यूमुखी पडलेल्यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. त्यात अति जोखमीच्या गटातील रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांची आयुर्वेदीय रसायनांद्वारे रोग प्रतिकारशक्ती कशी वाढविता येईल, याबाबत अत्याधुनिक पद्धतीने संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. यातील सुरुवातीचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक आहेत. यात आधुनिक शास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टर तसेच इतर शाखेतील शास्त्रज्ञही तितक्याच सकारात्मकतेने जोडले गेले आहेत.

– वैद्य योगेश बेंडाळे, रसायू आयुर्वेद क्लिनिकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments