Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : आरोपीला करोना - do not accuse

navi mumbai News : आरोपीला करोना – do not accuse


वकील, पोलिसांचे विलगीकरण

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोपीचे वकील आणि आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. तळोजा पोलिसांनी संबंधित आरोपीला चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक केले होते.

वाशी येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय आरोपीला चोरीच्या गुन्ह्यात तळोजा पोलिसांनी ७ जूनला ताब्यात घेतला होता. ताब्यात घेतल्यानंतर संबंधित आरोपीची करोनाचाचणी करण्यात आली. चौकशीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीस पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संबंधित आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मात्र याचदरम्यान आरोपीचा करोना अहवाल आल्यामुळे पोलिसांसह आरोपपत्र घेतलेल्या वकिलांना ही माहिती कळवताच वकील आर. के. पाटील यांनी स्वत:ला विलगीकरण करून घेतले. संबंधित आरोपीला एक रात्र पोलिस ठाण्यातील कारागृहात ठेवण्यात आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या इतर दहा आरोपींचीही करोनाचाचणी करण्यात येणार आहे. तसेच संपर्कात आलेले पोलिस कर्मचाऱ्यांनाही विलगीकरण होण्यास सांगितल्याचे तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी सांगितले. न्यायालयाने संबंधित आरोपीला करार करून जामिनावर सुटका केली आहे. पनवेल न्यायालयात मात्र या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. न्यायालयात येऊन गेलेल्या आरोपीला करोनाची लागण झाल्यामुळे न्यायालयात भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित आरोपीस पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. करोना पॉझिटिव्ह आलेला आरोपी मूळचा उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती देण्यात आली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments