Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : इरफानच्या पत्नीची भावनिक पोस्ट - irfan's wife's emotional...

navi mumbai News : इरफानच्या पत्नीची भावनिक पोस्ट – irfan’s wife’s emotional post


इरफान खानच्या पत्नीची भावनिक पोस्ट

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता इरफान खान याने २९ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. कर्करोगासारख्या असाध्य रोगावर मात करून भारतात परतल्यानंतर चित्रपटांत तो दमदार पुनरागमन करेल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या धक्कादायक मृत्यूमुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. यानंतर इरफानच्या पत्नीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

इरफान खान यांनी पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पत्नी सुतापाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. अगदी ‘जर पुन्हा जगायची संधी मिळाली तर पत्नीसाठी जगेन’, असे तो म्हणाला होता. यावरून त्याचे सुतापावर किती प्रेम होते याचा अंदाज येतो. सुतापाने लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘मी काही गमावलं नाहीये. मी सारं काही कमावलं आहे.’ इरफान आणि सुतापा यांनी १९९५मध्ये लग्न केले. सुतापा आणि इरफान एकमेकांना दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे भेटले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सध्या इरफानच्या पश्चात सुतापा आणि बाबिल आणि अयान ही मुलं आहेत.

इरफानच्या कुटुंबीयांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात सुतापा लिहितात, ‘आम्ही याला कौटुंबिक प्रतिक्रिया कशी म्हणायची जेव्हा संपूर्ण जगच याला वैयक्तिक नुकसान समजतंय. आम्ही स्वतःला एकटं कसं समजू शकतो जेव्हा लाखो लोक आमचं सांत्वन करत आहेत आणि आमच्यासोबत उभे आहेत. आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही काही गमावलेलं नाही उलट आम्ही खूप कमावलं आहे. आम्ही कमावलं आहे जे आम्ही त्याच्याकडून शिकलो आहोत.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

Recent Comments