Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : करोनाग्रस्त महिलांचे प्रमाण कमी - decreased proportion of...

navi mumbai News : करोनाग्रस्त महिलांचे प्रमाण कमी – decreased proportion of women with coronary heart disease


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील एकूण करोनाग्रस्तांपैकी ३८ टक्के महिला असल्याचे सरकारकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या वैद्यकीय विश्लेषण अहवालातून समोर आले आहे. पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. राज्यातील ६७,६६८ रुग्णांचे आरोग्य विश्लेषण करण्यात आले आहे.

सरकारने मृत्युदर कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी महिलांमध्ये करोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले. पुरुषांच्या तुलनेने बाहेरील संसर्गाशी थेट संपर्क जास्त नसल्यामुळे हे प्रमाण कमी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. करोनामुळे पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण ६४ टक्के, तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण ३६ टक्के आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये व्यसनाधीनता अधिक असते. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाणही पुरुषांमध्ये वाढत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होतात. करोना थेट फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असल्यामुळे पुरुषांमध्ये हे दुष्परिणाम अधिक दिसून येतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये १८०हून अधिक करोनाबाधित महिलांनी करोनामुक्त बाळांना जन्म दिला आहे. म्हणजेच आईकडून बाळाला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाणही नगण्य आहे. याची नेमकी कोणती कारणे आहेत, याचा अभ्यास विविध वैद्यकीय संस्थांमध्ये अभ्यास सुरू आहे.

८३ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले

राज्यात लक्षणे नसलेले एकूण रुग्ण ८३ टक्के, लक्षणे असलेल्यांचे प्रमाण १३ टक्के आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण चार टक्के असल्याचे वैद्यकीय विश्लेषणामध्ये नोंदवण्यात आले आहे. मंगळवार सकाळी १०पर्यंत ज्यांच्या प्रकृतीचा अभ्यास करण्यात आला, त्यापैकी ६९ टक्के रुग्णांना प्रकृतीसंदर्भात कोणत्या ना कोणत्या तक्रारी होत्या. ३१ टक्के रुग्णांमध्ये अशा तक्रारी दिसून आल्या नाहीत. राज्यात कोविड-१९च्या एकूण ४,८४,७८४ तपासण्या करण्यात आल्या. त्यातील १६ टक्के रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ८४ टक्के रुग्णांचे निगेटिव्ह आले आहेत.

राज्यातील चाचण्यांची स्थिती

– सार्वजनिक प्रयोगशाळा : २,६१,७८७

– खासगी प्रयोगशाळा : २,२२,९०६

– एकूण : ४,८४,७८४Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Srinagar terror attack: Srinagar Terror Attack: महाराष्ट्राचा वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद; धक्क्याने आई बेशुद्ध – yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद...

Mamata Banerjee: ‘असा गृहमंत्री आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही’ – mamata banerjee alleges pm modi amit shah and bjp farmers protest coronavirus issue

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) जवळ येताच राजकारणाचा पारा चढत चालला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता...

virat kohli: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला… – indian captain virat kohli opens up on lack of clarity, confusion over...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या...

Recent Comments