Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: करोना काळच्या विनाशवेळा! - corona's time of doom!

navi mumbai News: करोना काळच्या विनाशवेळा! – corona’s time of doom!


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bशहरातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पाच हजार जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ येऊ शकते. त्या दृष्टीने सज्ज रहा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते म्हणाले, करोनाबाधित रुग्णांची संख्या शहरात वाढत आहे. त्यामुळे आपण दक्ष राहणे गरजेचे आहे. पाच हजारापर्यंत लोकांना क्वारंटाइन करावे लागण्याती शक्यता आहे. त्यामुळे आपण आतापासून त्या दृष्टीने तयारी सुरू केली पाहिजे. ऐनवेळी धावपळ करण्याची वेळ येऊ देऊ नका. मुबंई, पुणे या शहरातून आपल्या शहरात आलेल्या नागरिकांची माहिती वॉर्ड अधिकाऱ्यांनी संबंधित पथकांना द्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले. आयुक्तांनी कामाची विभागणी देखील यावेळी केली. ‘आरोग्य विभागाने करोनाग्रस्त भागात जावून उपयार करणे, सर्वेक्षण करावे. त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल अभियंता, उपअभियंता,शाखा अभियंता यांनी द्यावा. पालक अधिकाऱ्यांनी इन्सिडन्ट कमांडर म्हणून काम पहावे, त्यांना तसे अधिकार दिले जातील. क्वारंटाइन केंद्रावरील प्रमुखाला एक लाखापर्यंतच्या खर्चाचे अधिकार दिले जात आहेत. गरज पडली तर खिशातून पैसे टाका. ते परत देण्याची मी जबाबदारी घेतो,’ असे आवाहनही त्यांनी केले.

२०९ जण होम क्वारंटाइन

‘करोनाच्या पाश्वर्भूमीवर महापालिकेने आतापर्यंत २०९ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. यापैकी १९५ जण कमी धोक्याचे आहेत,’ अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दिली. महापौर म्हणाले, ‘होम क्वारंटाइन केलेल्यांमध्ये विदेशातून जावून आलेल्या तीन व्यक्तींचा समावेश होता. त्यापैकी दोन व्यक्तींचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन मधून मुक्त केले. यातल्या १३ व्यक्ती अती धोक्याच्या आहेत. कलाग्राम येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये सध्या १५ तर शहरात विविध ठिकाणच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये २३० व्यक्तींची व्यवस्था केली आहे. फिवर क्लिनीकमध्ये शनिवारी ७२ जणांची तपासणी केली. यापैकी १२ जण संशयित आढळल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. फिवर क्लिनीकमध्ये आतापर्यंत ७९७ जणांची तपासणी केली. त्यापैकी ४१ जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवले आहे.’

B१४ मजूर पोलिसांच्या ताब्यात

Bचिकलठाणा येथे कामावर जाण्यासाठी निघालेल्या १४ कामगारांना आकाशवाणी चौकात शनिवारी जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहन चालकासह एकूण पंधरा जणांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. चिकलठाणा येथे पुरी भाजी तयार करून त्याची पॅकिंग करून ती विविध भागात वाटप करण्यासाठी हे कामगार एका लोडिंग रिक्षामधून जात होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिन्सी पोलिस स्टेशनचे पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीधर टाक हे आकाशवाणी चौकात पोहोचले. त्यांनी या रिक्षामधील चालकासह पंधरा जणांना जिन्सी पोलिस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cyclone nivar: निवार तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू – cyclone nivar weakens, but heavy rain in chennai, puducherry

चेन्नई :निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी...

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

Recent Comments