Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : करोना चाचण्यात औरंगाबाद दुसरे - aurangabad second in...

navi mumbai News : करोना चाचण्यात औरंगाबाद दुसरे – aurangabad second in corona test


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबादB

करोनाच्या सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या शहरांमध्ये राज्यात मुंबईनंतर दुसरा नंबर औरंबादचा ठरला असून, त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतो. महापालिका प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळेच बाधित रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या लाळेचे नमुने घेवून त्याची चाचणी करण्याचे प्रमाण वाढवले आहे. शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती पुन्हा करोना पॉझिटिव्ह होत असून, त्यामुळे या रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये प्रती दहा लाख लोकसंख्येच्या मागे सात हजार चाचण्या केल्या जात आहेत. औरंगाबादमध्ये हे प्रमाण पाच हजार एकशे अठ्ठावीस इतके आहे. पुणे शहरात चाचण्यांचे प्रमाण एक हजार नऊशे एकोणीस आहे. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, ‘महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. या ठिकाणी लाळेचे नमुने घेण्यासाठी फिक्स पॉइंट तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय जयभीमनगर – गुलाबवाडी, संजयनगर – मुकुंदवाडी आणि भीमनगर येथे देखील लाळेचे नमुने घेण्यासाठीचे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेचा टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे. या फोर्सच्या माध्यमातून देखील लाळेचे नमुने घेतले जात आहेत. त्यामुळे लाळेचे नमुने घेवून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे.

B—

चाचण्या

मुंबई

B७,०००

Bऔरंगाबाद

B५,०१८

Bपुणे

B१,९१९Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments