Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : करोना रुग्णालयाचे अखेर लोकार्पण - corona hospital finally...

navi mumbai News : करोना रुग्णालयाचे अखेर लोकार्पण – corona hospital finally inaugurated


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई म

वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात अतिदक्षता कक्ष उभारण्यासाठी राज्य सरकारचा आरोग्य विभाग सर्वोतोपरी सहकार्य करेल, शिवाय राज्य सरकारमार्फत आवश्यक व्हेंटिलेटरही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी वाशी येथे दिले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या करोना रुग्णालयाचे लोकार्पण टोपे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६० टक्के आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांनी ‘अनलॉक १’मध्ये सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन करून करोनाला दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारच्या रुग्णालयांमुळे आरोग्य सेवेला अधिक बळ मिळून चांगल्याप्रकारे उपचार करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. करोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ १२०० खाटांचे हे रुग्णालय २ महिन्यांच्या कालावधीत उभारण्यात आल्याचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. याठिकाणी नॉन ऑक्सिजन खाटांसह ५०० ऑक्सिजनसह खाटा तसेच एक्सरे, डायलिसिस, लॅबसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून ५० खाटांचे आयसीयू युनिट उभारण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. या रुग्णालयात ६० डॉक्टर, २५० परिचारिका व ३५० बहुउद्देशीय कर्मचारी रुग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. पॉझिटिव्ह लक्षणे नसणाऱ्या आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या १० करोनाबाधितांना गुरुवारी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पावसाची विश्रांती; आता सुरू होणार पॅचवर्क

म. टा. प्रतिनिधी, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता महापालिका पॅचवर्कच्या कामाकडे लक्ष देणार आहे. पुणे येथील एका कंपनीच्या मदतीने पॉलिमर तंत्रज्ञान वापरून महापालिकेच्या स्तरावर...

fyjc online admissions 2020: अकरावी प्रवेश लांबणीवर? विद्यार्थ्यांची आणखी चार आठवडे रखडपट्टी – fyjc online admissions 2020 uncertainty over fyjc online admissions continue due...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षण लागू करू नये, असे निर्देश देऊन मराठा आरक्षण...

Samsung Galaxy S21 series: सॅमसंगच्या या फोन्ससोबत मिळणार नाहीत चार्जर आणि इयरफोन – samsung galaxy s21 series may ship without in-box charger, headphones: report

नवी दिल्लीः अॅपलने नुकतीच आयफोन १२ सीरीज सोबत चार्जर आणि इयरपॉड्स न देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयाची अनेक ब्रँड्सने खिल्ली उडवत...

Recent Comments