Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : केंद्र स्वच्छ ठेवा, बक्षीस मिळवा - keep the...

navi mumbai News : केंद्र स्वच्छ ठेवा, बक्षीस मिळवा – keep the center clean, get the prize


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

विलगीकरण करण्यात आलेल्या संशयित रुग्णांना दिलेली खोली स्वच्छ ठेवावी, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करोना केअर सेंटर स्वच्छ ठेवण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा या हेतूने पनवेल महापलिकेने संशयित रुग्णांसाठी ‘स्वच्छ करोना केअर सेंटर स्पर्धां’ आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे आणि रोख रकमेची बक्षिसे जिंकावी, असे आवाहन करण्यात आले आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रातील संशयित नागरिकांना ठेवण्यासाठी कोन गावातील इंडिया बुल्स गृहप्रकल्पात व्यवस्था करण्यात आली आहेत. १००० जणांना ठेवता येईल अशी व्यवस्था इथे आहे. केवळ पनवेलच नव्हे तर मुंबई, नवी मुंबईतील करोना संशयितांनाही इथे ठेवण्यात येते. खारघर येथे ग्रामविकास भवनातही कोविड केअर सेंटर तयार करण्यात आलेले आहे. दोन्ही ठिकाणी ठेवण्यात आलेल्या रुग्णांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पनवेल महापालिकेची असून महापालिकेचे कर्मचारी याठिकाणी काम करतात. कोन येथील इंडियाबुल्स गृहप्रकल्पात काही दिवसांपूर्वी संशयित रुग्णांची काळजी घेणाऱ्या ५ सफाई कामगारांना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. संशयित नागरिकांकडून कोविड केअर सेंटरचा निष्काळजीपणे वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेला सहकार्य करून कोविड केअर सेंटरची काळजी घ्यावी या हेतूने पनवेल महापालिकेने ‘स्वच्छ करोना केअर सेंटर स्पर्धा’ जाहीर केली आहे. सफाई कामगार आणि स्वच्छता निरीक्षक संबंधित व्यक्तीच्या खोलीची तपासणी करून १० गुण देतील. एक ते पाच क्रमांक काढण्यात येणार असून अनुक्रमे ३० हजार, २५ हजार, २० हजार, १५ हजार आणि १० हजार इतक्या रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments