Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : कोविड कामासाठी अनुदानित शाळेतील शिक्षक - teacher at...

navi mumbai News : कोविड कामासाठी अनुदानित शाळेतील शिक्षक – teacher at a subsidized school for covid work


म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांतील १०० शिक्षकांना तत्काळ हजर राहण्याचे, तसेच संबंधित मुख्याध्यापकांनी या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी दिले. महापालिकेने शिक्षकांची कौटुंबिक व शारीरिक आजारपणाची माहिती न घेता, त्यांची निवड केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील खासगी अनुदानित शाळांतील १०० शिक्षकांना मदतीसाठी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी नवी मुंबईतील १०० शिक्षकांची यादी तयार करून त्यांना आज, सोमवारी महापालिका मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. महापालिकेकडून निवड करण्यात आलेल्या शिक्षकांवर निवासी नागरिकांची माहिती नोंदवून करोना विषाणूची माहिती देणे, जनजागृती करणे, सुरक्षित वावर राखण्याबाबत व स्वच्छतेबाबत सूचना देणे, त्या अनुषंगाने इतर कामे सोपविण्यात येणार आहेत. महापालिकेने निवड केलेल्या काही शिक्षकांच्या कुटुंबांत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आहेत.

सेवेत घेतलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण तसेच सुरक्षा साहित्य देणे आवश्यक आहे. या शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले न गेल्यामुळे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांनाच करोनाचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या शिक्षकांना प्रथम प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी सांगितले. कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांतील १०० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पालिकेच्या केंद्र समन्वयांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. खासगी अनुदानित शाळांना सरकारचे अनुदान मिळत असून पालिकेच्या शिक्षकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यापासून सलग आपत्ती निवारणाचे काम केले आहे. त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी व विश्रांती देण्यासाठी खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची निवड करण्यात आल्याचे नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Coronavirus vaccination: PM मोदींच्या इशाऱ्यानंतर मंत्र्याचा यू-टर्न, नाही घेतली करोनावरील लस – coronavirus vaccination telangana health minister etela rajender

हैदराबाद: सर्व प्रथम करोनावरील लस ( coronavirus vaccination ) आपण घेणार, अशी घोषणा तेलंगणचे आरोग्य मंत्री एटाला राजेंद्र यांनी केली होती. पण पंतप्रधान...

Recent Comments