Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : जनआरोग्य योजनेसाठी रुग्णालयेच ‘वेटिंग’वर - the hospital itself...

navi mumbai News : जनआरोग्य योजनेसाठी रुग्णालयेच ‘वेटिंग’वर – the hospital itself is waiting for the public health scheme


मटा विशेष

Mustafa.Attar@timesgroup.com

………

@mustafaattarMT

पुणे : करोनाबाधितांवर कमी दरांत उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्यदायी योजनेत समाविष्ट होण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. मात्र, ‘आमची रुग्णालयांना समाविष्ट करून घेण्याची मर्यादा संपली असून तुम्ही अर्ज करा,’ अशा शब्दांत योजनेच्या अधिकाऱ्यांकडून रुग्णालयांना उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांकडून रुग्णालयांनाच ‘वेटिंग’वर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारच्या योजनेचा लाभ गरिबांना देण्यात अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा अडसर उभा राहिला आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारी रुग्णालये ‘हाउसफुल्ल’ झाली आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स राखीव ठेवण्याचे आदेश आहेत. सरकारने उपचारांचे दरही निश्चित करून त्यानुसारच पैसे घेण्याचे आदेश बजावले आहेत. तरीही काही खासगी रुग्णालयांकडून अद्यापही भरमसाठ रक्कम वसूल करून लूट सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात खासगी रुग्णालयांमध्ये गरिबांना सवलत अथवा मोफत उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली. विमा नसलेल्या रुग्णांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात या योजनेंतर्गत ९९६ उपचारांचा लाभ खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सरकारी रुग्णालये ही कोव्हिड रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. रुग्णसंख्या वाढणार असल्याने खासगी रुग्णालयांचे बेड्स अधिगृहीत केले जाणार आहेत. खासगी रुग्णालयात आर्थिक दुर्बल नागरिकांसह विमा नसलेल्या नागरिकांचा या योजनेत लाभार्थी म्हणून समावेश करता येणे शक्य आहे. खासगी रुग्णालयाला त्या रुग्णांचा बोजा सहन करावा लागणार नाही. यासाठी ‘बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट’अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व रुग्णालये, नर्सिग होम यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची www.jeevandayee.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक असून तातडीने सर्व रुग्णालयांनी नोंदणी करावी, असे आदेश दिले आहेत. मात्र, या योजनेसाठी रुग्णालयांना ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले आहे.

योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील म्हणाले, ‘पुणे शहरातील ३०, ५० आणि १०० बेडची रुग्णालये योजनेत समाविष्ट होण्यासाठी संपर्क साधत आहेत. त्यांना अर्ज करा, असे सांगितले आहे. तातडीने मंजुरी देता येणार नाही. ही मंजुरी देण्याचे अधिकार मुंबईच्या योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. शहर जिल्ह्यात ६९ रुग्णालयांमध्ये योजना सुरू आहे.’ या संदर्भात योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता मात्र तो होऊ शकला नाही.

………..

महात्मा फुले योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रुग्णालयांना या योजनेत समाविष्ट करण्याचे धोरण विमा कंपनीसह आरोग्य खात्याने आखले आहे. सध्या रुग्णालयांची संख्या एक हजारच्या जवळपास गेली आहे. २५ हजार लोकसंख्येमागे एक रुग्णालय असे समीकरण आहे. त्यानुसार जेथे गरज असेल तेथेच रुग्णालयांना मान्यता देण्यात येणार आहे.

– डॉ. सागर पाटील, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जन आरोग्य योजना

……

महापालिकेच्या आदेशानुसार खासगी ३०, ५० आणि १०० बेडच्या अनेक रुग्णालयांनी नोंदणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य योजनेच्या समन्वयकांशी संपर्क साधला असता, ‘तुम्ही अर्ज करा. तुम्हाला लगेच मान्यता मिळेल याची खात्री नाही. सध्या पुण्यातील कोटा संपला आहे. अद्याप ५० रुग्णालये प्रतीक्षेत आहेत,’ असे उत्तर देण्यात आले आहे. एकीकडून आदेशाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला तर अडचण आणि दुसरीकडे सरकारी अधिकारीच योजनेत समाविष्ट करून घेण्यास आठमुठे धोरण स्वीकारत असल्याने रुग्णांना लाभ कसा देणार, हा प्रश्न आहे.

– डॉ. संजय पाटील, चेअरमन, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया पुणेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cyclone nivar: निवार तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू – cyclone nivar weakens, but heavy rain in chennai, puducherry

चेन्नई :निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी...

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

Recent Comments