Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : जिल्ह्यात आणखी १४ नवे रुग्ण - another 14...

navi mumbai News : जिल्ह्यात आणखी १४ नवे रुग्ण – another 14 new patients in the district


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात नव्याने १४ रुग्ण बाधित आढळून आले. मालेगाव शहरात नऊ, तर निफाड आणि मनमाडमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय सिन्नर तालुक्यातील कणकोरी या गावातही नव्याने रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७९६ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, मालेगावात आणखी सहा करोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे. यातील ४० मृत्यू एकट्या मालेगाव शहरात झाले आहेत.

करोना संशयित रुग्णांच्या प्रलंबित अहवालांपैकी काही अहवाल जिल्हा प्रशासनाला रविवारी दिवसभरात प्राप्त झाले. शनिवारी रात्री ११ पासून रविवारी रात्री १२ पर्यंत प्रशासनाला १४ नव्याने बाधित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ मालेगावात नऊ रुग्ण बाधित आढळल्याने तेथील एकूण रुग्णसंख्या ६१७ झाली आहे. याशिवाय मनमाड येथे ६१ आणि ३० वर्षीय पुरुषांना करोनाची बाधा झाली आहे. निफाड तालुक्यातील विष्णूनगर आणि कसबे सुकेणे येथे दोन बाधित रुग्ण आढळल्याने ही ठिकाणेही प्रतिबंधित क्षेत्रात गेली आहेत. याशिवाय सिन्नर तालुक्यात नांदूरशिंगोटेजवळील कणकोरी गावातही एका ३८ वर्षीय तरुणाला संसर्ग झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण संख्या १०३ पर्यंत पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात शहरात एकही रुग्ण आढळून न आल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या – ७९६

जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्ण संख्या – १०३

मालेगाव शहरातील रुग्ण संख्या – ६१७

नाशिक शहरातील रुग्ण संख्या – ४६

जिल्ह्यातील एकूण बाधीत मृतांची संख्या – ४२

मालेगावातील बाधीत मृतांची संख्या – ४०

नाशिक शहरातील मृतांची संख्या – ०२

पूर्णपणे बरे झालेले रुग्ण – ५४८

प्रलंबित अहवाल – २६८

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४८९

उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण – २०१Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

येथे जाड सुईने 'टुचुक' केले जाईल…

एक मार्च हा दिवस काळाच्या दंडावर कायमस्वरूपी अन् करकचून टोचून ठेवला गेला आहे, याबाबत आमच्या मनात किंचितही शंका नाही. साक्षात पंतप्रधान नमोजींनी या...

Recent Comments