Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News: टँकरमधून लपून प्रवास - hiding journey from the tanker

navi mumbai News: टँकरमधून लपून प्रवास – hiding journey from the tanker


म टा…

Updated:

MT

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

करोनाचा वाढता प्रार्दुभाव, लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची भीती या पार्श्वभूमीवर गावाकडे परतण्यासाठी इंधनाच्या टँकरमधून १८ विद्यार्थ्यांनी जीवघेणा प्रवास केल्याचे उघड झाले आहे. या १८ विद्यार्थ्यांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. टँकरचालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलंगण व आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा, गुडूर, राजमूदी, काकीनाडा येथील काही विद्यार्थी जालना येथील एका प्रशिक्षण कंपनीत पदविका अभ्यासक्रमासाठी शिकायला होते. महाविद्यालय बंद, जवळचे पैसे संपत आले, कोणाचा सहारा नाही. त्यामुळे काय करावे अशा विवंचनेत ते होते. अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने या सर्वांनी एका टँकरचालकाशी संपर्क केला.

मध्य प्रदेशचे पासिंग असलेल्या एका टँकरचालकाशी संपर्क करून शुक्रवारी मध्यरात्री जालना येथून या सर्वांनी प्रवासाला प्रारंभ केला. सकाळी हा टँकर नांदेडमध्ये दाखल झाला. छत्रपती चौकात गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने तो अडवला. कागदपत्रांची तपासणी सुरू असताना टँकरमधून मानवी आवाज आल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांना टँकरचे झाकण उघडे दिसले. टँकरमध्ये डोकावले असता त्यात १६ युवक आणि दोन युवती असल्याचे आढळले. त्यांना आणि टँकरचालकास भाग्यनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gujarat coronavirus: एक अॅम्ब्युलन्स अन् चार मृतदेह… गांधीनगरमध्ये करोनाने होणारे मृत्यू लपवले जाताहेत? – gujarat coronavirus dead bodies in ambulance photo viral nitin patil...

अहमदाबादः गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ( gujarat coronavirus ) सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( viral photo ) होतोय. या व्हायरल फोटोत एका...

Recent Comments