Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : ढोले पाटील रोड भागात सर्वाधिक संसर्ग - most...

navi mumbai News : ढोले पाटील रोड भागात सर्वाधिक संसर्ग – most infected in dhole patil road area


म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या ८५ दिवसांमध्ये करोनाच्या सर्वाधिक संसर्गामुळे ‘रेड झोन’मध्ये असलेल्या भवानी पेठेतील लोहियानगर, कासेवाडी भागाला मागे टाकून आता ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या भागात विशेषतः ताडीवाला रस्त्यावरच विषाणूने पाय पसरल्याचे दिसून आले आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये या भागात शहरातील सर्वाधिक १४४२ जणांना संसर्ग झाला असून त्यात ताडीवाला रस्ता परिसरात बाधितांची संख्या मोठी आहे.

त्या पाठोपाठ येरवडा-कळस धानोरी या क्षेत्रिय कार्यालयातील येरवडा, नागपूर चाळ या भागात अनेकांना लागण झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कोथरूड, बावधन, औंध आणि बाणेर या भागात कमी प्रमाणात रुग्ण आढळल्याने हा भाग ‘सेफ झोन’ ठरला आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या अहवालात ही बाब समोर आली. ९ मार्च ते ३१ मे दरम्यान शहरात पालिकेच्या आरोग्य विभागानुसार ६४८३ जणांना लागण झाली. ९ मार्च ते १६ मेपर्यंत पुण्यात ३३०७ जणांना लागण झाली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.

सुरुवातीला भवानी पेठ परिसरात सर्वाधिक लागण आणि बळींची संख्या अधिक होती. करोनाच्या विषाणूने ताडीवाला रस्ता, कोरेगाव पार्क आणि ढोले पाटील रस्त्याचा भाग असलेल्या भागाकडे मोर्चा वळविला आहे. त्या भागात पंधरा दिवसांमध्ये १४४२ जणांना लागण झाली असून त्यात ताडीवाला रस्ता भागातील १०९९ जणांचा समावेश आहे. त्यानंतर येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ८५१ जणांना लागण झाली असून त्यापैकी येरवड्यात सर्वाधिक ६८५ जणांना गेल्या पंधरा दिवसांत लागण झाली. कळस, धानोरी भागात ४९ जणांना लागण झाली. भवानी पेठ भागात ८२२ जणांना लागण झाली. या भागातील रास्ता पेठ, रविवार पेठ, महात्मा फुले पेठ, लोहियानगर, कासेवाडीत संसर्ग असल्याचे आढळले.

कसबा-विश्रामबाग विभागात पर्वती भागातील रुग्णसंख्या २८३ पर्यंत गेली. शिवाजीनगर, घोले रोड, पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी भागातील पाटील इस्टेट येथे ३८५ जणांना लागण झाली. त्यापाठोपाठ बिबवेवाडी भागातील महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क भागात २३५ तसेच मार्केट यार्ड, अप्पर इंदिरानगर भागात रुग्ण आढळले. वानवडी, रामटेकडी भागातील कोंढवा खुर्द-मिठानगर; रामटेकडी, सय्यदनगर भागात; तर धनकवडी-सहकारनगर भागातील सहकारनगर, पद्मावती परिसरात रुग्ण आढळल्याने तेथील नागरिक चिंतेत होते.

शहराच्या उर्वरित भागांमध्ये रुग्णांची संख्या या भागांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. त्या हडपसर-मुंढवा, नगर रस्ता- विश्रांतवाडी, सिंहगड रस्ता, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, वारजे कर्वेनगर, कोथरूड-बावधन, औंध, बाणेर या भागात मात्र; रुग्णांची संख्या गेल्या पंधरा दिवसांमध्ये कमी असल्याचे दिसून आले आहे. साधारणतः वारजे-कर्वेनगर, कोथरूड, बावधन आणि औंध, बाणेर भागात सध्या तरी रुग्णसंख्या कमी आहे.

क्षेत्रीय कार्यालय —- १६ ते ३१ मे दरम्यानची एकूण रुग्णसंख्या

ढोले पाटील रोड —१४४२

येरवडा-कळस-धानोरी —८५१

भवानी पेठ —-६२२

कसबा-विश्रामबागवाडा —-५९२

शिवाजीनगर, घोले रस्ता —-५२८

बिबवेवाडी—-४६८

वानवडी-रामटेकडी ——३६३

धनकवडी, सहकारनगर—–२६८

हडपसर-मुंढवा—-२३६

नगर रोड, वडगाव शेरी —-२१०

सिंहगड रस्ता—-१९३

कोंढवा, येवलेवाडी —-१०७

वारजे, कर्वेनगर —४५

कोथरूड, बावधन —–३२

औंध, बाणेर—-३२

शहराच्या हद्दीबाहेरील —-२९४Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

priyam gandhi book: सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचा भाजपला होता पाठिंबा? नवाब मलिकांनी केला खुलासा – nawab malik attacks on bjp over priyam gandhi book

मुंबईः प्रसिद्ध लेखिका प्रियम गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या नाट्यावर लिहलेल्या पुस्तकावरून राजकीय वातारवरण तापल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शरद पवारांचा भाजपला...

hyderabad director general of police: Hyderabad : नेत्यांच्या भडकाऊ भाषणांवर पोलिसांची नजर, कारवाईचा इशारा – hyderabad civic body election police chief warns against controversial...

हैदराबाद : हैदराबाद महानगर पालिका निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...

Recent Comments