Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : ‘त्या’ पोलिसांच्या कुटुंबाला निवासस्थान - residence to the...

navi mumbai News : ‘त्या’ पोलिसांच्या कुटुंबाला निवासस्थान – residence to the family of ‘those’ policemen


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या लढाईत संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवासस्थानात वास्तव्य करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

‘जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलिस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत,’ असे आदेशही देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर दिले. करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजाविताना राज्यात ५४ पोलिसांना प्राण गमवावा लागला आहे. पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तीन महिन्यांमध्ये सरकारी निवासस्थान सोडावे लागते. याबाबत देशमुख म्हणाले, ‘राज्यामध्ये ५४ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या पोलिसांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी निवासस्थानामध्ये राहता येईल, असा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.’

‘पुणे जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिका आणि पोलिस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत,’ असे देशमुख म्हणाले. ‘नागरिकांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे,’ अशी माहिती देशमुख यांनी दिली. खासगी रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची कार्यपद्धती प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे, असे खासदार गिरीश बापट म्हणाले. ‘मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधे, रॅपिड टेस्टिंग टेस्‍ट आदी बाबींचा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments