Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : नांदेडमध्ये आढळले २१ नवे रुग्ण - 21 new...

navi mumbai News : नांदेडमध्ये आढळले २१ नवे रुग्ण – 21 new patients found in nanded


नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत करोना आजाराचे तब्बल २१ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत २२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ११ जणांचा बळी गेला आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी दोघांचा बळी गेल्यानंतर गुरुवारी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. विशेष म्हणजे २१ जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. ते सर्वच पॉझिटिव्ह आले आहेत. देगलूर नाका, नई आबादी, इतवारा, गुलजार बाग, उमर कॉलनी पाठोपाठ वृंदावन कॉलनी, फरांदेनगर परिसरात नवे रुग्ण आढळले. भाग्यलक्ष्मी बँकेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या बँकेतील ८० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नांदेडसह मुखेडमध्ये दोघांना करोनाची लागण झाली. हे दोघे पुण्याहून काही दिवसांपूर्वी नांदेडात दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत २२४ पैकी १३९ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर ७४ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

नांदेड शहरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला आहे. सकाळी भरणाऱ्या भाजीपाला बाजारात नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. उपाययोजना करूनही नागरिक काही केल्या ऐकायला तयार नसल्याने प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.

बीडमधील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात गुरुवारी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी पाठविलेले २७ नमुने प्रलंबित होते. त्यातील दोन जण करोनाग्रस्त असल्याचे व उर्वरित २५ अहवाल निगेटिव्ह असल्याचे गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील २६ संशयितांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील केज तालुकयातील उमरी येथील रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health minster rajesh tope: चाचण्यांसाठी पुन्हा दरकपात – maharashtra goverment again reduced price of corona test

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यात करोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली...

Lasalgaon onion market: मुंबई बाजारात कांद्याची आवक घटली – onion imports declined in mumbai due to onion auction close in lasalgaon onion market

म. टा. वृत्तसेव, नवी मुंबईकांद्याची मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक करणाऱ्या साठेबाजांवर धाडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर, कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये लिलाव बंद पडले आहेत....

Recent Comments