Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : पनवेलमध्ये २९ रुग्णांची भर - addition of 29...

navi mumbai News : पनवेलमध्ये २९ रुग्णांची भर – addition of 29 patients in panvel


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीण असे एकूण २९ रुग्ण रविवारी वाढले. उलवे नोडमध्ये एकाच कुटुंबातील चारजणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तर, एकूण २५ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील करोनारुग्णांची संख्या कमी होत नसली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. रविवारी पनवेल महापालिका क्षेत्रात २० रुग्णांची भर पडली. कामोठ्यात सर्वाधिक रुग्ण असून नावडे, नवीन पनवेल, पनवेल शहरात करोनाबाधित आढळले आहेत. तर, पनवेल तालुक्यात रविवारी नऊ रुग्णांची भर पडली. उलवे नोड सेक्टर १९मध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन महिला आणि एका पुरुषाला लागण झाली आहे. संबंधित कुटुंबातील पाच सदस्यांना यापूर्वीच करोनाची बाधा झाली आहे. याव्यतिरिक्त सुकापूर, विचुंबे, करंजाडे, उसर्ली खुर्द आदी भागांत रुग्ण आढळले आहेत. तर, पनवेल महापालिका क्षेत्रातील १२ आणि ग्रामीण भागातील १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

सिद्धार्थ आनंद: सहाय्यक दिग्दर्शकाने मारलंच नाही, जाणून घ्या ‘पठाण’च्या सेटवर नक्की काय घडलं – story behind pathan movie director siddharth anand fight

मुंबई-शाहरुख खान यांच्या आगामी 'पठाण' सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्याच्या सहाय्यक दिग्दर्शकामध्ये मोठं भांडण झाल्याचं बोललं जात आहे. हे भांडण...

Recent Comments