Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : पनवेलमार्गे पुढे सरकले वादळ - the storm moved...

navi mumbai News : पनवेलमार्गे पुढे सरकले वादळ – the storm moved forward through panvel


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

अलिबागहून आलेले निसर्ग चक्रीवादळ पनवेलमार्गे नाशिककडे वळले. वादळ येणार म्हणून दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र कुठेही जीवितहानी घडली नाही.

निसर्ग चक्रीवादळ पनवेलमार्गे नाशिकच्या दिशेने प्रवास करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. सकाळपासून पाऊस रिमझिम पाऊस सुरू होता. दुपारी साडेबारा वाजल्यापासून वारे वाहण्यास सुरुवात झाली. दुपारी दोन वाजता वादळाने वेग घेतला आणि अनेक ठिकाणी दुर्घटना घडण्यास सुरुवात झाली. दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर वादळ शांत झाल्यामुळे पावसाचा वेग अधिक वाढला. पनवेल तालुक्यात सकाळी प्रांतअधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार साडेअकरा वाजल्यानंतर वीज खंडित करण्यात आली होती. वादळाचा वेग मंदावताच पनवेलच्या शहरी भागात वीज सुरळीत करण्यात आली, मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. नावडे, करंजाडे येथे उच्चदाब वीजवाहिनी कोसळल्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित केला होता. वादळ येणार असल्याने रस्त्यावर गर्दी नव्हती. पनवेल न्यायालयाची इमारत, कळंबोली पोलिस ठाण्यावर झाड कोसळले. तसेच, पनवेलमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वृक्ष वाहनांवर कोसळल्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

पावसाळी शेडचे मोठे नुकसान

वादळात सर्वाधिक नुकसान पावसाळी शेडचे झाले. पावसाळ्यात घराला गळती लागू नये म्हणून गावांमध्ये, शहरी भागांत इमारतींवर पावसाळी पत्र्याचे शेड लावण्यात येतात. वादळामुळे शेडदेखील उडून जाण्याचा घटना अनेक ठिकाणी घडल्या.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

salman khan: सलमान खानच्या कुटुंबाची ट्वेन्टी-२० लीगमध्ये एंट्री, संघात ख्रिस गेल खेळणार… – bollywood star salman khan’s brother sohail own team in sri lanka...

नवी दिल्ली : बॉलीवूड आणि क्रिकेटचे जुने नाते आहे. आयपीएलमधील संघही काही बॉलीवूड स्टार्सने खरेदी केलेले आहेत. आता यामध्ये बॉलीवूडचा भाईजान असलेला सलमान...

Sushant Singh Rajput Case Dipesh Sawant Demands Ncb For 10 Lakh Compensation – सुशांत केसः दिपेश सावंतची मागणी; NCB वर गंभीर आरोप करत मागितले...

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक...

nokia 2 v tella: दोन दिवस बॅटरी लाईफचा नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत – nokia 2 v tella with mediatek helio a22 soc,...

नवी दिल्लीः HMD ग्लोबल ने नवीन नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच केला आहे. हा कंपनीचा नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे....

LIVE : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाला सुरुवात | National

पाऊस BREAKING : पिंपरी चिंचवड- शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात  पुण्यातही दमदार पावसाची हजेरी पुढील 3 ते 4 तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा...

Recent Comments