Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : पनवेल पालिकेकडून पीपीई कीटची खरेदी - purchase of...

navi mumbai News : पनवेल पालिकेकडून पीपीई कीटची खरेदी – purchase of ppe insect from panvel municipality


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

करोना रुग्णांचा संसर्ग पनवेल महापालिकेत वाढला नसला, तरी पनवेल महापालिकेने करोनावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिका प्रशासनाने तीन हजार पीपीई किटची खरेदी केली. बाजारभावापेक्षा शंभर रुपये कमी दराने ही खरेदी करण्यात आली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ८८ करोनाबाधित रुग्ण आढळले. रायगड जिल्ह्यात असलेल्या पनवेल तालुका ‘रेड झोन’मध्ये असल्यामुळे तालुका वगळता इतर जिल्हा ‘ऑरेंज झोन’मध्ये आहे. पनवेल तालुक्यात मागील काही दिवसांत रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयारी केली. महापालिकेने पीपीई किट खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेला प्रतिसाद मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने निविदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रति पीपीई किटचा दर ७०० रुपये इतका आहे, मात्र महापालिकेला मिळालेल्या प्रतिसादानुसार ६०० रुपये दराने प्रति पीपीई किट महापालिकेला मिळाले. महापालिकेने नव्याने तीन हजार पीपीई किट खरेदी केल्यामुळे प्रशासनाकडे सध्या चार हजार पीपीई किट उपलब्ध आहेत. येत्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेला अजून १० हजारांहून अधिक पीपीई किट खरेदी करण्याची आवश्यकता पडू शकते, असे मत पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केले.

महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना करोनाची लागण अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडल्यानंतर अधिक होत आहे. ही संख्या पुढे वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन हजार पीपीई किट खरेदी केली आहेत. भविष्यातदेखील किटची आवश्यकता लागू शकते. सध्या तरी महापालिकेकडे मुबलक पीपीई किट आहेत.

– गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

महाविकास आघाडी: ‘हा’ विषय बावनकुळेंना समजू शकणार नाही; गृहमंत्र्यांचा पलटवार – the power outage in mumbai is a technical matter, says anil deshmukh

हायलाइट्स:मुंबईतील 'पॉवर कट'वरून भाजप-महाविकास आघाडी आमनेसामनेमाजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची राज्य सरकारवर टीकागृहमंत्री अनिल देशमुख यांचा बावनकुळेंवर पलटवारनागपूरः मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा...

PM Modi: pm modi : PM मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये होणार तुफानी प्रचारसभा, भाजपची रणनीती तयार – assembly election 2021 pm modi bjp campaign strategy...

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची ( assembly election 2021 ) घोषणा केली. त्यापुढच्या काही...

nicolas sarkozy corruption: Nicolas Sarkozy Corruption भ्रष्टाचार प्रकरणी फ्रान्सच्या माजी अध्यक्षांना तुरुंगवासाची शिक्षा – former french president nicolas sarkozy guilty of corruption given one...

पॅरिस: फ्रान्सचे माजी अध्य़क्ष निकोलस सरकोझी यांना पॅरिसमधील न्यायालयाने सोमवारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्यांना एक वर्ष तुरुंगवास आणि निलंबित कारावासाची शिक्षा सुनावण्यात...

Recent Comments