Home मुंबई नवी मुंबई navi mumbai News : प्राध्यापकांचे पगार थकले - professors' salaries tired

navi mumbai News : प्राध्यापकांचे पगार थकले – professors’ salaries tired


Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

Bशासकीय पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे पगार तब्बल सहा महिन्यांपासून थकले आहे. त्यात करोना लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबांचे अक्षरश: हाल सुरू आहेत.

राज्यातील विद्यापीठे महाविद्यालयीन स्तरावरील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या वेतन थकबाकी, वेतनातील कपातचा प्रश्न कायम असताना शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्नही समोर आला आहे. या शिक्षकांना गेल्या अनेक महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासकीय संस्थांची संख्या मोठी असून तेथेच वेतन थकल्याने प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे. शासकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरतीची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नेमणुका केल्या जातात. औरंगाबाद शहरातील शासकीय संस्थांमधील तासिका तत्वावर शिकणाऱ्या प्राध्यापकांची संख्या ही मोठी आहे. करोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अशा अडचणीच्या काळात ही या शिक्षकांना वेतन न मिळाल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात प्रशासकीय गोंधळही निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात या शिक्षकांनी तासिका घेतल्या की नाही याबाबतही प्रशासकीय गोंधळ आहे.

Bनिधीची कमतरता?

Bकरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले आणि अनेक प्रशासकीय प्रक्रिया थांबल्या. यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे पगाराचा निधी अद्याप आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे याला विलंब लागल्याचे सांगण्यात येत असून प्रकिया सुरळीत झाल्यानंतर प्रकिया होण्याची शक्यता आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याचे त्यामुळेही अडचणी वाढत असल्याचे सांगण्यात आले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

marathi actress turned entrepreneurs: सई ताम्हणकर , प्रिया बापट… मराठी अभिनेत्रींनी वळवला व्यवसायाकडे मोर्चा – sai tamhankar to priya bapat a look at marathi...

अभिनय क्षेत्रात ठसा उमटवल्यानंतर अनेक कलाकार वेगवेगळ्या व्यवसायात पाऊल टाकताना दिसताहेत. त्यात प्रामुख्यानं फॅशनविश्वाशी संबंधित व्यवसायांचा समावेश आहे. दसऱ्याचं निमित्त साधून अभिनेत्री सई...

जगातील पहिला ब्लड सेन्सरचा फीचर फोन Pulse 1 लाँच, किंमत १९९९ ₹

नवी दिल्लीः होम ब्रँड हँडसेट मेकर लावाने आज आपला लेटेस्ट फीचर फोन Pulse 1 लाँच केला आहे. हा फीचर फोन जगातील पहिला कॉन्टॅक्टलेस...

Aurangabad Corona Update: coronavirus – तीन मृत्यू, ८४ नवे बाधित – aurangabad reported 84 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण करोना बळींची संख्या १०५८ झाली आहे. त्याचवेळी सोमवारी (२६ ऑक्टोबर) जिल्ह्यात ८४ नवे...

Recent Comments